Top News महाराष्ट्र मुंबई

“महाराष्ट्राचे इरादे पक्के, पुद्दुचेरीचे खेळ महाराष्ट्राच्या मातीत चालणार नाही”

Photo Credit- Facebook/ Narendra Modi

मुंबई | पुद्दुचेरीतील काँग्रेसचं सरकार कोसळलं आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेनं सामनातून भाजपवर सडकून टीका केली आहे. महाराष्ट्राचे मन खंबीर आहे, इरादे पक्के आहेत. मध्य प्रदेश, पुद्दुचेरीचे खेळ महाराष्ट्राच्या मातीत चालणार नाही, असं म्हणत शिवसेनेनं भाजपवर टीकास्त्र सोडलं आहे.

पुद्दुचेरीतले सरकार पाडून दाखवलं, आता मार्च-एप्रिल महिन्यात महाराष्ट्रात ‘ऑपरेशन लोटस’ला सुरुवात करू, असं काही भाजप पुढाऱ्यांनी जाहीर केलं. मध्य प्रदेशातील सरकार पाडलं तेव्हाही पुढचा घाव महाराष्ट्रावर असं जाहीरच केलं होतं. त्यानंतर बिहारचे निकाल एकदाचे लागू द्या, मग पहा महाराष्ट्रात कसे परिवर्तन घडवून दाखवतो वगैरे बतावण्या करून झाल्या. आता बात पुद्दुचेरीची सुरू आहे, पण जशी दिल्ली बहुत दूर है त्याप्रमाणे महाराष्ट्र तो बहुतही दूर है, असा टोला शिवसेनेनं भाजपला लगावला आहे.

मध्य प्रदेश, पुद्दुचेरीत काँग्रेस होती. महाराष्ट्रात शिवसेना आहे. त्यामुळे कोणी नसती उठाठेव करण्याच्या भानगडीत पडू नये, असा इशारा शिवसेनेनं भाजप नेत्यांना दिला आहे.

राज्यपाल महाराष्ट्राचे असोत नाहीतर पुद्दुचेरीचे, त्यांना दिल्लीचे आदेश पाळूनच उठाठेवी करायच्या असतात. राज्यपालांचा वापर जेवणातील कढीपत्त्यासारखा केला जातो. किरण बेदी यांनाही कढीपत्त्याप्रमाणे वापरून फेकून दिले आहे हे महाराष्ट्रात फोडणी देणाऱ्या ‘भाज्यपालां’नी समजून घेतले पाहिजे. केंद्रीय सत्तेचा वापर करून विरोधकांची राज्यांतील सरकारे पाडायची हे सध्या काही जणांना शौर्य वगैरे वाटत असेल तर ते चूक आहे, असं शिवसेनेनं म्हटलंय.

थोडक्यात बातम्या-

धक्कादायक! साठ वर्षाच्या ‘या’ खासदाराने केलं 14 वर्षाच्या मुलीसोबत लग्न

चित्राताई ठेचतील या भीतीने नागोबा बाहेर आला- प्रसाद लाड

“शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे शब्दाचे पक्के होते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मात्र लबाड”

रायगडावर महाराजांच्या चरणी नतमस्तक व्हायचं असेल तर पाळावे लागणार ‘हे’ नियम!

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात ‘तो’ व्हिडीओ झाला लीक, संजय राठोडांचा संबंध असल्याचा दावा!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या