…नाहीतर जनता बंड करेल; शिवसेनेचा भाजपला इशारा

उद्धव ठाकरे

मुंबई | जनतेच्या सहनशीलतेचा अंत होईल तेव्हा जनताच बंड करेल, असा इशारा शिवसेनेनं मुखपत्र सामनातून दिला आहे. निवडणुकांच्या काळात दिलेल्या खोट्या आश्वासनांवरून शिवसेनेनं भाजप सरकारला धारेवर धरलं आहे. 

निवडणूकांमध्ये दिलेली आश्वासने पूर्ण न केल्यास गुन्हा दाखल करण्यात येईल, अशी भूमिका राज्य निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया यांनी मांडली होती. त्यावर निवडणूक आयोगाची घोषणा इतर घोषणांप्रमाणे पोकळ ठरू नये, असा टोला शिवसेनेनं लगावला आहे.

दरम्यान, विद्यमान सत्ताधाऱ्यांनी दिलेल्या आश्वासनांची किती पूर्तता झाली यांची माहिती निवडणूक आयोगाने घ्यावी. त्यानुसार कृती करण्याचा सल्ला शिवसेनेनं दिला आहे. तसंच लोकशाहीत थापा मारणे हा निवडणूक जिंकण्याचा एक मार्ग बनला अाहे, असा टोलाही शिवसेनेनं लगावला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-संभाजी भिडेंसोबत फडणवीस सरकारनं आणखी कुणाविरुद्धचे गुन्हे मागे घेतले?

-मुख्यमंत्र्यांची कृपादृष्टी; संभाजी भिडेंसह अन्य नेत्यांवरील गुन्हे मागे

-एन्काउंटर स्पेशालिस्ट उत्तर प्रदेश पोलिसांना चिमुरडीचं भावनिक आवाहन!

-वर्षात एखादाच जवान मरतो, नुकसान भरपाई वाढवून देऊ; भाजप मंत्र्याचं बेताल वक्तव्य

-होय, मनसेला सोबत घेण्यासाठी राष्ट्रवादीचा प्रस्ताव आलाय!

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या