शिवसेनेनं श्रीपाद छिंदमच्या खुर्चीचा अक्षरशः कडेलोट केला!

अहमदनगर | छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अपशब्द काढणाऱ्या श्रीपाद छिंदमच्या खुर्चीचा शिवसेना कार्यकर्त्यांनी अक्षरशः कडेलोट केला. पालिकेच्या पायऱ्यांवरुन ही खुर्ची ढकलून तोडण्यात आली. 

अहमदनगर महापालिकेचा उपमहापौर असताना छिंदम ही खुर्ची वापरत होता. भाजपने त्याला उपमहापौरपदावरुन बडतर्फ केल्यानंतर आता शिवसेनेचे अनिल बोरुडे उपमहापौरपदी विराजमान झालेत. 

दरम्यान, खुर्चीची तोडफोड करताना शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना छिंदमविरोधात जोरदार घोषणाबाजीही केली. छिंदमच्या निषेधार्थ घोषणा देण्यात आल्या.