बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पुण्यातील आजच्या आकडेवारीमध्ये लक्षणीय घट, वाचा आजची आकडेवारी

पुणे | भारतात आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने पुण्यात देखील धुमाकूळ घातला होता. पुणे शहर कोरोनाचं हॉटस्पॉट ठरलं होतं. मात्र, याच पुण्यात आता कोरोनाबाधितांची संख्या प्रचंड कमी झाली आहे. राज्य सरकारने केलेल्या लॉकडाऊनचा फायदा झाला असल्याचं या कमी झालेल्या संख्येवरून दिसत आहे.

पुण्यात आज दिवसभरात 314 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली आहे. तर दिवसभरात 231 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज कोरोनामुळे 11 जणांना आपल्या प्राणाला मुकावं लागलं आहे. यामध्ये 05 जण पुण्याबाहेरील होते.

पुण्यात सध्या 236 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 4,81,227 इतकी आहे. तर पुण्यात 3018 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. आत्तापर्यंत एकूण 8642 जणांचा कोरोनामुळे मृत्यु झाला आहे. आजपर्यंत 4,69,567 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी दररोज नव्याने नोंद होणाऱ्या कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. त्यादृष्टीने पुणे महानगरपालिका प्रशासनाने कडक पावलं उचललीत. त्यामुळे ही रूग्णसंख्या घटली.

थोडक्यात बातम्या-

मला सुत्र द्या आम्ही जे बोलतो ते करून दाखवतो- देवेंद्र फडणवीस

सोन्या-चांदीच्या दरात आज देखील मोठी घसरण, पटापट तपासा ताजे दर

शाहिद कपूरच्या बायकोची ऑनलाईन फसवणूक; फोटो शेअर करत म्हणाली…

“55 आमदारांमध्ये मुख्यमंत्री झाला, 50 नगरसेवकांमध्ये पिंपरी चिंचवडचा महापौर का होणार नाही?”

“मला आणि कराडांना गोपीनाथ मुंडेंनीच घडवलं, आम्ही साहेबांचेच कार्यकर्ते”

Shree

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More