अहमदनगर | देशात भाजपचे सरकार आहे. यानंतरही भाजपचेच सरकार येणार आहे. त्यामुळे त्यांना मतदान करुन घाटे का सौदा करु नका. त्यांचे घड्याळ बंद पडलेलं आहे, असं म्हणत केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी राष्ट्रवादीवर टीका केली आहे. त्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत.
स्मृती इराणी या श्रीगोंदा येथे प्रचारसभा घेत होत्या. यावेळी त्यांनी काँग्रेस-राष्ट्रावादीवर जोरदार हल्लाबोल केला आहे. सत्तेच्या माध्यमातून जेव्हा स्वत:ची तिजोरी भरली त्याच वेळी त्यांचा खेळ संपला आहे, अशी टीका त्यांनी केली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात महाराष्ट्र चांगली प्रगती करत आहे. देशात आणि राज्यात भाजपचेच सरकार असणे गरजेचं आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीने जनतेची लूट चालवली होती, असंही त्या म्हणाल्या आहेत.
दरम्यान, विधानसभा निवडणुकीला काही दिवस शिल्लक राहिले असून प्रचाराचा आखाडा चांगलाच तापत असल्याचं दिसून येतंय.
महत्त्वाच्या बातम्या-
“वातावरण फिरलंय; डिस्कळकराचं ठरलंय” https://t.co/ttFh7cXFQd @shindespeaks
— थोडक्यात (@thodkyaat) October 15, 2019
अफवांवर विश्वास ठेवू नका; मराठा आरक्षण रद्द झालेलं नाही!- https://t.co/zMYU4woSLD #marathareservation
— थोडक्यात (@thodkyaat) October 15, 2019
“निवडणुकीनंतर काँग्रेसमध्ये फक्त प्रदेशाध्यक्षच राहतील” – https://t.co/F5gmHqug4T @RVikhePatil
— थोडक्यात (@thodkyaat) October 15, 2019
Comments are closed.