बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

…म्हणून पश्चिम बंगालमध्ये भाजपचा झाला पराभव- चंद्रकांत पाटील

मुंबई | सर्व देशाचं लक्ष लागून असलेल्या पाच राज्यातील निकालांवरून कोणत्या पक्षानी बाजी मारली तर कोणाचा पराभव होणार हे आता स्पष्ट दिसत आहे. अशातच पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीमध्ये ममता बॅनर्जी यांच्या तृणमुल काँग्रेसने विजयाच्या दिशेने वाटचाल केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनीही प्रचार सभा घेतल्या होत्या. मात्र दोघांची जादू काही चालताना दिसली नाही. यावर राज्यातील भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भाजपच्या पराभवाचं कारण सांगितलं आहे.

पश्चिम बंगालमध्ये भाजपला अपेक्षित जागा मिळाल्या नाहीत. येथे भाजपला रोखण्यासाठी सर्व पक्ष एकत्र आले होते. बंगालमध्ये एकेकाळी निर्विवाद सत्ता राखणारे डावे आणि जास्त जागा जिंकणाऱ्या काँग्रेसचे संख्याबळ मर्यादित राहिलेले दिसते. बंगालमध्ये काँग्रेस आणि डाव्यांनी तृणमूल काँग्रेससोबत अघोषित आघाडी केल्याचं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

अघोषित आघाडीमुळे काँग्रेस आणि डाव्यांनी आपली मते तृणमूलच्या पारड्यात टाकली, त्यामुळे भाजपच्या जागा कमी झाल्याचा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते.

दरम्यान,निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस 202 जागांवर आघाडीवर आहे. तर भाजपला आतापर्यंत 78 जागांवर आघाडी मिळाली आहे. तर काँग्रेस केवळ एका जागेवर आघाडीवर आहे.

थोडक्यात बातम्या- 

“देशात भाजपविरोधी लाट, ममतादीदी झाशीच्या राणीसारख्या लढल्या”

शरद पवारांचा ‘तो’ अंदाज ठरला खरा, दीड महिन्यापूर्वीच वर्तवलं होतं निकालाचं भाकित

“दीदी ओ दीदी या अपमानजनक टिप्पणीला जनतेचं सडेतोड उत्तर”

कडक सॅल्यूट! डाॅक्टर आणि नर्सवर हात उचलण्याआधी हा व्हिडीओ एकदा नक्की पहा

‘अंदाज अपना अपना’, बंगालमध्ये प्रशांत किशोरांनी सांगितलं होतं तसंच झालं

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More