बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘सीबीआय नको ईडीमार्फत चौकशी करू’; दत्तात्रय भरणेंनी भर सभागृहात लगावला टोला

सोलापूर | भाजपचे आमदार राम सातपुते यांनी जिल्ह्याला मिळणाऱ्या एसडीआरएफ फंडात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप जिल्हा नियोजन बैठकीत केला होता. यावर सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी त्यांना भर सभागृहात खोचक टोला लगावला आहे.

“एसडीआरएफ फंडातून जिल्ह्याला कोट्यवधीचा निधी प्राप्त झाला होता. मात्र या फंडात भ्रष्टाचार झाला आहे. याची सीबीआयमार्फत चौकशी करण्यात यावी”, अशी मागणी करत याप्रकरणी मी स्वत: सीबीआयकडे तक्रार करणार असल्याचं राम सातपुते म्हणाले होते. यावर दत्तात्रय भरणे यांनी ‘सीबीआय नको ईडीमार्फत चौकशी करू’, असा टोला लगावला आहे.

याशिवाय ‘तसंच काही झालं असल्यास तर त्याची चौकशी करण्यासाठी आपली यंत्रणा सक्षम आहे’, असंही दत्ता भरणे यांनी बैठकीत सांगितलं आहे. यावेळी आमदार संजय शिंदे आणि सोलापूर महानगरपालिकेचे नगरसेवक आनंद चंदनशिवे यांनीही राम सातपुतेंना या मुद्दयावरून चांगलंच लक्ष्य केलं आहे.

यावेळी चंदनशिवे म्हणाले, “राम सातपुते सीबीआय चौकशीची मागणी करत आहेत. मात्र, त्यांनी माळशिरस मतदारसंघात वंचित समाजातील  व्यक्तीला स्मशानभूमी मिळाली नाही. त्याला जबाबदार कोण? याची चौकशी राम सातपुते यांनी करायला हवी.” असं आनंद चंदनशिवे यांनी सुनावलं आहे.

थोडक्यात बातम्या-

“वानखेडे प्रकरणी आता मुख्यमंत्री लिहिणार पंतप्रधान मोदींना पत्र”

मुकेश अंबानींची मोठी उडी! आता पेट्रोलियम क्षेत्रात घडणार नवी क्रांती?

‘…तर मी मंत्रिपदाचा राजीनामा देईन’, वानखेडे-मलिक वाद विकोपाला

बाप बापच असतो! ग्रामपंचायत निवडणुकीत बाप-लेक भिडले अन्…

”ती’ खोली हेच स्वातंत्र्याचं खरं सत्य’; सेल्युलर जेलला भेट दिल्यानंतर कंगना भारावली

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More