बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

शरद पवारांकडून अमित शहांना खास निमंत्रण; लवकरच अमित शहांचा पुणे दौरा

मुंबई | दिल्लीत नेत्यांच्या भेटीगाठीमुळे राजकीय वातावरण तापलेलं दिसत आहे. त्यातच गृहमंत्री अमित शहा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची दिल्लीत बैठक पार पडली. या भेटीत सहकार क्षेत्राशी निगडीत समस्या आणि प्रश्नांवर विस्तृत चर्चा झाली. त्यानंतर शरद पवारांनी अमित शहा यांना एक खास निमंत्रण दिलं आहे.

शहा-पवार भेटीवर शरद पवारांनी मौन सोडलं होतं. बैठकीत सहकार क्षेत्रासह साखर उद्योग आणि त्यावरील प्रश्नांबाबत चर्चा झाल्याचं शरद पवारांनी सांगितलं आहे. तसेच या बैठकीला नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑपरेटीव्ह शुगर फॅक्टरी लिमिटेडचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर आणि प्रकाश नाईकनवरे हे देखील अपस्थित असल्याची माहिती शरद पवारांनी दिली होती. त्यावेळी शरद पवारांनी अमित शहा यांना वसंतदाद शुगर इस्टिट्युटच्या भेटीचं निमंत्रण दिलं आहे.

सप्टेंबर महिन्यात गृहमंत्री अमित शहा पुणे दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यादरम्यान अमित शहांनी वसंतदादा शुगर इस्टिट्युटच्या भेटीला यावं, अशी विनंती शरद पवारांनी केल्याची माहिती समोर येत आहे. 3 तारखेला झालेल्या या बैठकीत आमंत्रण दिल्याचं सांगितलं जातंय. याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वसंतदादा शुगर इस्टिट्युटला भेट दिली होती.

दरम्यान, शरद पवार यांचं राजकारण साखर कारखान्यांभोवती फिरत असतं असं मानलं जातं. देशातील सहकार क्षेत्रात शरद पवारांचा मोठा वाटा आहे. त्यातच आता अमित शहा हे देशाचे पहिले सहकारमंत्री बनले आहेत. त्यामुळे शरद पवार आणि अमित शहा यांच्यात चांगले संबंध निर्माण होऊ शकतात.

थोडक्यात बातम्या-

गरीब घरातला श्रीमंत माणूस; नाव न सांगण्याच्या अटीवर पांडुरंगाचरणी 1 कोटींचं दान!

’15 दिवस धोक्याचे’; केंद्राकडून राज्यांना अलर्ट राहण्याच्या सूचना

41 वर्षांनंतर हाॅकी संघानं रचला इतिहास; रोमांचक सामन्यात भारताचा दणदणीत विजय

मी चुकीचा होतो तर, केंद्रावर ही वेळ का आली?- अशोक चव्हाण“चित्रा वाघ यांना शिवसेनेत यायचं होतं पण शिवसेनेनं प्रवेश नाकारला, त्यामुळे त्या…”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More