बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

धक्कादायक! अहमदनगर येथे एसटी बसेसवर दगडफेक

अहमदनगर |  राज्यात सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनावरून (ST Employee Strike) राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे. राज्य सरकारनं एसटी कर्मचाऱ्यांना वेतनवाढ जाहीर केली असली तरी आंदोलक कर्मचारी विलिनीकरणाच्या मुद्द्यावर ठाम आहेत. काही ठिकाणी आता एसटी सुरुदेखील झाल्या आहेत. मात्र आता अहमदनगर येथे तीन एसटी बसेसवर दगडफेक करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

एसटी कर्मचाऱ्यांना पगारवाढ देऊन कामावर रुजू होण्याचं आवाहन परिवहन मंत्री अनिल परब यांनी केलं होतं. त्यानंतर राज्यातील अनेक आगारातील एसटीसेवा सुरुही झाल्या आहेत. मात्र तरीही काही कर्मचाऱ्यांचा वाहतुक सेवा सुरु करण्यास विरोध केला होता.याच विरोधातून अहमदनगर येथील शेगाव आगाराच्या एसटी बसेसवर दगडफेक करण्यात आली आहे.

शेगाव आगारात करण्यात आलेल्या दगडफेकीत बसचालक गंभीर जखमी झाला आहे. त्यामुळे आता एसटी कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. एसटी सुरु झाल्याने खासगी वाहतुकदाराचे नुकसान होणार आहे. त्यामुळे त्याच भीतीने खासगी वाहतुकदारानेच ही दगडफेक केली असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

दरम्यान, एकीकडे समितीचं काम सुरू आहे आणि समितीचा अहवाल हा 12 आठवड्यात द्यायचा आहे. त्या प्रक्रियेला भरपूर वेळ लागणार असल्याने तोपर्यंत संप चालू राहू शकत नाही, त्यामुळे अंतरीम वेतनवाढीचा पर्याय दिला असल्याचं परिवहन मंंत्री अनिल परब यांनी स्पष्ट केलं आहे. त्यातचं आत अहमदनगर येथूून ही घटना समोर आल्याने पुन्हा एकदा सरकारची चिंता वाढली आहे.

थोडक्यात बातम्या-

“महाविकास आघाडी सरकार म्हणजे दुसऱ्याच्या ताटात तोंड घालणारे मांजर”

“वीर दासने दोन भारत दाखवले म्हणून उच्चभ्रूंच्या कपाळात…”

शेअर बाजारात घसरण पण ‘बिगबुल’च्या शेअर्समध्ये तब्बल एवढ्या टक्क्यांची वाढ

मुंबईतील कोरोनाबाधितांसह मृतांची संख्याही दिलासादायक, वाचा ताजी आकडेवारी

“जरा जास्तच मुदत दिल्याबद्दल नारायण राणेेेंचे आभार”, जयंत पाटलांचा पलटवार

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More