मुंबई | पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात गेले काही दिवस शिवसेनेचे नेते आणि वनमंत्री संजय राठोड यांच्यावर आरोप केले जात होते. आज तब्बल 15 दिवसांनी संजय राठोड पहिल्यांदा जनतेसमोर आले. वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी देवस्थान येथे संजय राठोड आपल्या परिवारासह दर्शनासाठी आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधत आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला.
त्यावेळी बोलताना संजय राठोड म्हणाले, याप्रकरणात संपूर्ण महाराष्ट्रभर जे घाणेरडं राजकारण केलं जातंय ते अतिशय चुकीचं आहे. माझा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही. उगाच माझी, माझ्या परिवाराची आणि माझ्या समाजाची कोणीही बदनामी करू नये, असं आवाहन त्यांनी केलं आहे. सोबतचं पोलीस तपास करत आहेत चौकशीत सगळं बाहेर येईल असंही यावेळी राठोड म्हणाले.
संजय राठोड यांच्या वक्तव्यावरून पुन्हा भाजपने सरकारला कोंडीत पकडण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. कोणत्याही चौकशीचा निष्कर्ष येईपर्यंत संबंधित मंत्र्याने आपल्या पदाचा त्याग केला पाहिजे, ही या देशाची परंपरा आहे. कारण एखादा पीआय किंवा एपीआय चौकशी करत असतो तो मंत्रिपदापेक्षा लहान असतो. त्याच्यावर मंत्र्याचा दबाव येऊ शकतो. त्यामुळे अशा आरोपावेळी मंत्र्यांनी पायउतार व्हायला हवं. लाल कृष्ष अडवाणी यांनी ‘हवाला’ प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत संसदेची पायरी चढली नव्हती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही या परंपरेचे पालन केले आहे. त्या दृष्टीने उद्धव ठाकरे यांनी योग्य निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, राज्यातील महिला, मुलींच्या मनात याविषयी काय यातना होत असतील, याची जाणीव सरकारला व्हावी. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मौन सोडत राज्यातील जनतेच्या प्रश्नांची उत्तर द्यायला हवीत. राज्याचे मुख्यमंत्री सामाजिक दबावाला बळी पडत आहे का? अशा शब्दांत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सरकारवर टीका केली आहे.
थोडक्यात बातम्या-
सांगलीत भाजपला धक्का, जयंत पाटलांनी महापालिकेवर उधळला राष्ट्रवादीचा गुलाल
राज्याचे मुख्यमंत्री सामाजिक दबावाला बळी पडत आहेत का?- प्रवीण दरेकर
‘मी गायब नव्हतो तर या काळात मी…’; संजय राठोडांनी दिलं स्पष्टीकरण
15 मेपासून व्हाॅट्सअप वर मेसेज पाठवता येणार नाही!, जाणून घ्या नविन पाॅलिसीबाबत
आई रागावल्यानं मुलगी घराबाहेर पडली, नराधमांच्या कृत्यानं माणुसकी ओशाळली!