गरिबांना साखर कडूच, दारिद्र्य रेषेखालील रेशनवर साखर नाही!

Photo- Pixabay

मुंबई | दारिद्र्य रेषेखाली रेशन कार्डावर यापुढे साखर मिळणार नाही. राज्य सरकारने यासंदर्भात पाठवलेला प्रस्ताव केंद्र सरकारने फेटाळून लावला आहे. अन्न पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी ही माहिती दिली. 

राज्यातील 45 लाख रेशनधारकांना ही साखर मिळत होती. मात्र सरकारच्या या निर्णयामुळे यापुढे या कुटुंबाना रेशनवर साखर मिळणार नाही. 

दुसरीकडे अंत्योद्य योजनेअंतर्गत गरीब कुटुंबांना मिळणाऱ्या साखरेचे दर वाढवण्यात आले आहेत. 15 रुपये प्रति किलो दराने मिळणारी साखर आता 20 रुपये प्रति किलो दराने मिळणार आहे.