देश

…ही असंवेदनशीलता भयावह आहे; मोदी सरकारवर सुप्रिया सुळे संतापल्या!

नवी दिल्ली | लॉकडाउनदरम्यान किती कामगार स्थलांतरीत झाले तसेच किती कामगारांचे मृत्यू झाले? असा प्रश्न विरोधी पक्षाने लोकसभेत सरकारला विचारला. यावर सरकारनं आपल्याकडे याची माहिती नसल्याचं आश्चर्यकारक उत्तर दिलं आहे. यावरून राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.

केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्रालयाने स्थलांतरीत मजूरांची नोंद आपल्याकडे नाही त्यामुळे त्यांना मदत करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असं कळवलं आहे. ही अतिशय संतापजनक बाब असून ही असंवेदनशीलता कोणत्याही व्यक्तीला चीड आणणारी आहे, असं सुप्रिया सुळेंनी म्हटलंय.

सुरुवातीला कोरोनाचं गांभीर्य न ओळखून नंतर मात्र कसलंही नियोजन न करता अतिशय घाईघाईने केंद्र सरकारने लॉकडाऊन केलं. अनेक गरीब मजूरांना उपाशीपोटी, हजारो किलोमीटर रस्त्याने पायी चालत जायला भाग पाडलं. अनेकांनी रस्त्यातच प्राण सोडले. गोरगरीबांचे हे हाल केंद्र सरकारच्या लक्षात आले नाहीत का?, असा संतप्त सवाल सुळेंनी लोकसभेत केंद्र सरकारला केलाय.

रेल्वे रुळावर हातात भाकरी घेऊन झोपेतच कटलेल्या मजूरांचे मृतदेह केंद्र सरकारला दिसले नाहीत का? वडिलांच्या खांद्यावर भुकेने व्याकूळ होऊन मरण पावलेल्या लेकरांचा टाहो ऐकायला आला नाही का? ही असंवेदनशीलता भयावह आहे, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

 

महत्वाच्या बातम्या-

मराठा क्रांती मोर्चा आक्रमक, आंदोलनाच्या तारखा केल्या जाहीर

‘या’ माजी आमदाराचा अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश

पुणे विद्यापीठाचा अंतिम वर्षाच्या परीक्षेचा आराखडा जाहीर

पुण्यातील ‘या’ सोसायटीमध्ये एकही कोरोना रुग्ण नाही

…म्हणून मी काँग्रेस पक्ष सोडला- उर्मिला मातोंडकर

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या