मुंबई | एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर आता शिवसेना आक्रमक झाली आहे. त्यांनी बंडखोर आमदारांविरोधात कारवाईचा उपाय काढला आहे. शिवसेनेच्या सुनिल प्रभु यांनी आतापर्यंत 16 बंडखोर आमदारांविरोधात अपात्र ठरवण्याची कारवाई करण्याची मागणी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे केली आहे. याविरोधात शिंदे गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. 27 जूनला या खटल्यावर सुनावणी होणार आहे.
शिवसेनेचे वकील देवदत्त कामत म्हणाले, विधानसभेच्या सदस्याने पक्ष सोडल्यास तो विधानसभेच्या सदस्यत्वातून अपात्र ठरतो, असं घटना सांगते. शिवसेनेने 16 बंडखोर आमदारांवर कारवाई सुरु केली आहे. शिवसेनेने अधिकृत पत्र पाठवूनही आमदार बैठकीला उपस्थित राहिले नाहीत म्हणून कारवाई केली जात आहे.
पक्षांतरविरोधी कायदा टाळण्यासाठी, जेव्हा सदस्यांनी स्वत:ला दुसऱ्या पक्षात विलीन केलं असेल तर दोन तृतीआंंश बहुमताचं तत्व पुर्ण लागू होतं. परंतु आमदारांनी अजून कोणत्याही पक्षात प्रवेश केला नसून ते कारवाईला पात्र आहेत.
शिवसेना बंडखोर आमदारांचा गट सुरुवातीला भाजप पक्षात विलीन होण्याची माहिती मिळत होती तर आता त्यांचा मनसेसोबत संपर्क वाढल्याची चर्चा सुरु आहे. सर्व आमदारांना आज दुपारी चार वाजेपर्य़त विधानभवनात हजर होण्याचे आदेश सरकारने दिले होते.
थोडक्यात बातम्या –
“40 बंडखोर आमदारांच्या फक्त बॉड्या महाराष्ट्रात येणार”
बंडखोर आमदारांना ‘नाच्या’ म्हणत राऊतांचा गंभीर इशारा, म्हणाले…
“हवा, पाणी, डोंगर, हॉटेल आपल्या राज्यातही आहे, या इकडे”
मोठी बातमी! एकनाथ शिंदेंचा मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना फोन
“राज्यातील हालचाली पाहता काहीही घडू शकतं, त्यामुळे…”
Comments are closed.