पुणे महाराष्ट्र

‘स्व-रुपवर्धिनी’च्या मोफत MPSC शिष्यवृत्तीची घोषणा; 1 तारखेपासून करता येणार अर्ज

पुणे | स्व-रुपवर्धिनी संस्थेतर्फे दरवर्षी 50 विद्यार्थ्यांना MPSC परीक्षेसाठी शिष्यवृत्ती दिली जाते. 2020 साठीच्या शिष्यवृत्ती योजनेची घोषणा संस्थेतर्फे नुकतीच करण्यात आली आहे.

शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. संस्थेची वेबसाईट www.swaroopwardhinee.org या संकेतस्थाळावरुन तसेच संस्थेच्या पारगे चौक, मंगळवार पेठ, पुणे येथील कार्यालयात अर्ज भरता येणार आहेत.

1 जूनपासून यासंदर्भात अर्ज उपलब्ध होणार आहे. तर 30 जून रोजी प्रवेश परीक्षा पार पडणार आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांची मुलाखत देखील घेतली जाणार आहे.

गरजू व ग्रामीण भागातील अभ्यासू विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्तीसाठी प्राधान्य दिलं जातं. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना एक वर्षे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनासह अभ्यासिका आणि ग्रंथालय मोफत वापरता येते. 2018 मध्ये संस्थेच्या 40 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांची अ आणि ब वर्ग अधिकारी म्हणून निवड झाली आहे.

महत्वाच्या बातम्या

-धोनीमुळे भारताचा खेळ समृद्ध होतो- विराट कोहली

-मोदींचे असत्याचे प्रयोग; राष्ट्रवादीने बनवला व्हीडिओ

-मी मालमत्ता जमवल्याचं सिद्ध करा; मोदींचं खुलं आव्हान

-…तरीही पुन्हा केंद्रात भाजपचीच सत्ता येईल- नितीन गडकरी

-पश्चिम बंगालमधील शहांच्या रॅलीत हिंसाचार; योगींची रॅली रद्द

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या