Top News देश

विनाकारण फिरणाऱ्या तरुणांना पोलिसांनी कोरोना पेशंटसोबत ठेवलं? काय आहे सत्य???

चेन्नई | कोरोनामुळे सध्या देशभरात लॉकडाऊन असताना तमिळनाडूच्या तिरुपूर पोलिसांचा व्हिडीओ सोशल मीडियात जोरदार व्हायरल झाला आहे. विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या तरुणांना कोरोना पेशंटसोबत ठेवण्यात आल्याचं या व्हिडीओत दिसतंय. मात्र हा एक जनजागृतीसाठी बनवण्यात आलेला व्हिडीओ आहे.

लॉकडाऊनचं महत्त्व लोकांना पटवून देण्यासाठी पोलिसांनी हा व्हिडीओ तयार केला आहे. हा व्हिडीओ लोकांच्या चांगलाच आवडला असून तो मोठ्या प्रमाणावर शेअर होत आहे.

लॉकडाऊनवेळी विनाकारण फिरणाऱ्या काही तरुणांना पोलीस अडवतात, या तरुणांनी ना मास्क घातलेलं असतं ना इतर कुठली काळजी घेतली असते. पोलीस या तरुणांना ताब्यात घेतात आणि जवळच असलेल्या अॅम्बुलन्समध्ये बसवतात.

दरम्यान, अॅम्बुलन्समध्ये एक कोरोनाचा पेशंट दाखवला आहे. हा पेशंट पाहून या तरुणांची बोबडीच वळते. ते सैरावैरा पळण्याचा तसेच अॅम्बुलन्समधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतात. हा एक विनोदी व्हिडीओ असून त्याद्वारे महत्त्वाचा संदेश देण्यात पोलीस यशस्वी झाले आहेत.

ट्रेंडिंग बातम्या-

विद्यापीठाच्या ऑनलाईन परीक्षा कधी होणार?, उदय सामंत म्हणाले…

कोरोनामुळे जगभरातील उद्योग बुडाले मात्र ‘या’ तीन उद्योजकांची चांदी

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या