बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

Tata, Mahindra च्या दोन शानदार SUV लवकरच होणार लाँच; जाणून घ्या अधिक माहिती…

नवी दिल्ली | सध्या भारतात सर्वात टाॅपला असणारी टाटा कंपनी लवकरच अणखी एक एसयूव्ही लाँच करण्याच्या तयारीत आहे. तसेच महिंद्रा कंपनी देखील त्यांची नवीन एसयूव्ही लवकरच लाँच करणार आहे. टाटा तीचं नवीन माॅडेल दिवाळीच्या आधी लाँच करणार असल्याची माहिती आहे.

सध्या भारतामध्ये एसयूव्हींची मागणी मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे अनेक विदेशी कंपन्या देखील भारतात पदार्पण करत आहेत. या मागण्यांना पाहून अनेक कंपन्यानी बऱ्याच एसयूव्ही तसेच काॅम्पॅक्ट एसयूव्ही देखील लाँच केल्या आहेत. मात्र आता लवकरच या सगळ्यांना टक्कर देण्यासाठी टाटा आपली एचबीएक्स कन्सेप्ट बेस्ड मिनी एसयूव्ही आणि बीएस 6 हेक्सा सफारी, तर महिंद्रा त्यांची न्यू जनरेशन एक्सयूव्ही 500 आणि स्काॅर्पिओ लाँच करण्याच्या तयारीत आहे.

टाटा गाडीचे डिझाईन विशेषतः गाडीचा पुढचा भाग हा हॅरियरकडून घेतला जाईल. या गाडीमध्ये 83 बीएचपी, 1.2 ली नॅचरली एस्पिरेटेड पोट्रोल आणि 100 बीएचपी टर्बो इंजीनचा पर्याय देण्यात येईल. टाटाची हेक्स सफारी हे माॅडेल बीएस 6 कंप्लायंट 2.2 ली व्ह्यारीकोर टर्बोचार्जड डिजेल इंजिनसह सादर केले जाईल, जे आपल्याला 153 बीएचपी आणि 400 एनएम टाॅर्क देईल.

सेकेंड जनरेशन महिंद्रा XUV500 आणि नवीन स्कॉर्पियोमध्ये डिझाईनच्या बाबतीत बरेच बदल केले जातील. दोन्ही एसयूव्ही मोठ्या डिझाइनसह आणि अधिक सामर्थ्यवान वैशिष्ट्यांसह बाजारात येतील.

थोडक्यात बातम्या-

राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत कमालीची वाढ; गेल्या 24 तासांत ‘इतक्या’ हजार रूग्णांची नोंद

‘शार्ली हेब्दो’चं आणखी एक वादग्रस्त व्यंगचित्र, वाचा काय आहे प्रकरण

देवेंद्र फडणवीसांसह भाजप नेत्यांनी घेतली अमित शहांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

‘तुम्ही प्रचार करू नका’; ‘या’ काँग्रेस नेत्याचं शरद पवारांना पत्र

विद्यार्थ्यांच्या परिक्षेसंदर्भात पुणे विद्यापीठाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय!

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More