बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

टाटांच्या इलेक्ट्रिक कारला देशवासियांची सर्वाधिक पसंती, आता केला ‘हा’ मोठा विक्रम!

मुंबई | भविष्यात मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिक वाहने रस्त्यांवर धावताना दिसतील, असं म्हटलं जात होतं. परंतु आता तशी परिस्थिती राहिलेली नाही. जगभरातील लोकांनी आपला मोर्चा इलेक्ट्रिक वाहनांकडे वळवला आहे. प्रदूषण आणि पेट्रोल, डिझेल यांच्या वाढत्या किंमतींमुळे लोकांचा इलेक्ट्रिक वाहनांकडे  कल वाढत चालला आहे. देशातील काही शहरांमध्ये पेट्रोलच्या किंमती शंभरी पार गेल्या आहेत, तर काही शहरांमध्ये पेट्रोलच्या किंमती 90 रुपयांच्या पुढे आहेत.

पूर्वी इलेक्ट्रिक वाहनांच्या बजेटमुळे लोक चिंतेत असायचे, परंतु आता तसे चित्र राहिलेलं नाही. कार/मोटारसायकल कंपन्या कमीत कमी बजेटमध्ये जास्तीत जास्त फिचर्स देणाऱ्या इलेक्ट्रिक कार्स, बाईक आणि स्कूटर लाँच करत आहेत. टाटा कंपनीची एक इलेक्ट्रिक कार अशी आहे, जिला गेल्या काही वर्षांपासून भारतात मोठी मागणी आहे. सध्या तरी टाटाची ही इलेक्ट्रिक कार भारतीय इलेक्ट्रिक कार मार्केटमध्ये वर्चस्व गाजवतेय. TATA Nexon EV असं या कारचं नाव आहे.

टाटा नेक्सॉन इलेक्ट्रिक एसयूव्हीची एक्स शोरूम किंमत 13.99 लाख रुपये ते 16.25 लाख रुपयांपर्यंत आहे. ही कार XM, XZ+ आणि XZ + LUX अशा तीन व्हेरियंट्समध्ये उपलब्ध आहे. नेक्सॉन ईव्हीच्या XM व्हेरियंटची किंमत 13.99 लाख रुपये आहे, तर XZ+ आणि XZ+ LUX व्हेरियंटची किंमत अनुक्रमे 15.25 लाख आणि 16.25 लाख रुपये आहे.

दरम्यान, या इलेक्ट्रिक एसयूव्ही मध्ये दिलेलं इलेक्ट्रिक मोटर इंजिन 129PS पॉवर आणि 245Nm पीक टॉर्क जनरेट करतं. या कारमध्ये 30.2 kWh लिथियम-आयन बॅटरी पॅक आहे. एकदा फुल चार्ज झाल्यानंतर टाटा नेक्सॉन 312km पर्यंत धावू शकते. शून्य ते 100 किलोमीटर प्रति तास इतका वेग घेण्यासाठी नेक्सॉनला 9.9 सेकंद लागतात.

थोडक्यात बातम्या – 

वयाच्या 92व्या वर्षी ‘या’ ज्येष्ठ शेतकरी नेत्याने केली कोरोनावर मात

कोरोना उपचारात आता प्लाझ्मा थेरपी नाही; ICMR आणि AIIMSचा मोठा निर्णय

आता तुम्हाला नेटवर्क प्रॅाब्लेम येणार नाही, जिओनं उचललं सर्वात मोठं पाऊल!

लॉकडाऊनमध्ये घरातच पोल डान्स करायला गेली महिला अन्…; पाहा हास्यास्पद व्हिडिओ

आता 15 मिनिटात कोरोना रिपोर्ट; ‘या’ कंपनीनं तयार केली 100 रूपयांची कोरोना चाचणी किट

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More