देश

ऐकावं ते नवलच! वर्गशिक्षिकाच आठवीच्या मुलासोबत घरातून पळाली

Loading...

गांधीनगर | शिक्षकांवर शाळेतील मुलांना घडवण्याची जबाबदारी असते. पुस्तकी ज्ञानाबरोबर विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार करणे शिक्षकांचे कर्तव्य असते. मात्र या परंपरेला छेद देणारी घटना गुजरातमधील अहमदाबादमध्ये घडली आहे. शाळेतील वर्गशिक्षिकाच आठवीत शिकणाऱ्या मुलासोबत पळून गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शिक्षिका आणि मुलामध्ये एक वर्षांपासून घनिष्ठ संबंध निर्माण झाले होते. त्याचच रुपांतर प्रेमात झालं. समाज आपल्याला स्वीकारणार नाही हे लक्षात येताच या दोघांनी पळून जाण्याचा निर्णय घेतला. टाईम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलं आहे.

Loading...

मुलाच्या वडिलांनी शिक्षिकेवर फुस लावून पळवून नेल्याचा आरोप करत गांधीनगर जिल्ह्यातील कालोल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. शुक्रवार दुपार पासून शिक्षिका आणि मुलगा बेपत्ता आहेत.

दरम्यान, शिक्षिका आणि मुलगा या दोघांनी सोबत मोबाईल नेलेले नाहीत. त्यामुळे त्यांचा शोध लावण्यास वेळ लागत आहे. तसेच वर्गशिक्षिकाच किशोरवयीन मुलासोबत पळून गेल्याची ही दुर्मिळ घटना आहे, असं पोलिसांनी म्हटलं आहे.

Loading...

ट्रेंडिंग बातम्या-

शिवरायांची मोदींशी आणि तानाजींची अमित शहांशी तुलना; व्हिडीओ व्हायरल

मुख्यमंत्री आणि अजय देवगण एकत्र ‘तानाजी’ चित्रपट पाहणार

‘तुकडे तुकडे गँग’ अस्तित्वात नाही; गृह मंत्रालयाची कबुली

Loading...

महत्वाच्या बातम्या-

 

 

 

Loading...
Loading...

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या