बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

भारतातील ‘या’ ठिकाणांवर दहशतवाद्यांचा डोळा, गुप्तचेर यंत्रणेकडून हाय अलर्ट जारी

नवी दिल्ली | तालिबानने अफगाणिस्तान ताब्यात घेतल्यानंतर जगभरात अशांततेसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे जगातील सगळ्यांचं लक्ष सध्या तालिबानच्या कारवायांकडे लागून आहे. अशातच आयएस केपी संघटनेचे प्रशिक्षित दहशतवादी भारतावर हल्ला करण्याची शक्यता गुप्तचेर यंत्रणेकडून वर्तवण्यात येत आहे.

अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमध्ये असलेल्या दहशतवादी संघटनेच्या उच्च कमांडमधील अधिकाऱ्यांनी भारतात असलेल्या दहशतवादी सेलशी संपर्क साधला आहे. त्यानुसार दहशतवाद्यांना आयडी आणि लहान शस्त्रे करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याचं आश्वासन दिलं असल्याची माहिती समोर आली आहे, असं गुप्तचेर यंत्रणेनं सांगितलं आहे.

आयएस या दहशतवादी संघटनेच्या लक्ष्यावर उजव्या विचारांचे नेते, धार्मिक स्थळे, पाश्चात्य देश आणि गर्दीची ठिकाणं असल्याचं सांगितलं जात आहे. त्याच बरोबर ते परदेशी लोकांना ही लक्ष्य करू शकतात, अशी माहिती गुप्तचेर यंत्रणांनी दिली आहे.

दरम्यान, अमेरिकेने अफगाणिस्तानमधून काढता पाय घेतल्यानंतर जैश-ए-मोहम्मद आणि लष्कर-ए-तैयबा यासारख्या दहशतवादी संघटनांना बळ मिळालं असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. अफगाणिस्तानवर ताबा मिळवलेल्या तालिबानचे पाकिस्तानबरोबर चांगले संबंध आहे. त्यावरून तज्ज्ञांनी अंदाज बांधल्याचं दिसुन येत आहे.

थोडक्यात बातम्या-

‘मोदींच्या जीवावर विजयी व्हायचं अन्…’, चंद्रकांत पाटलांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा; पाहा व्हि़डीओ

‘मंदिरं खुली करा नाहीतर…’; मनसेचा ठाकरे सरकारला अल्टिमेटम!

व्हाट्सअॅपचा मोठा दणका! भारतातील ‘तशा’ वापरकर्त्यांची खाती केली बंद

…अन् मुलाने थेट कानशिलात लगावली; लखनऊ मुलीच्या व्हिडीओनंतर ‘या’ व्हिडीओचा धुमाकूळ

“मी एक भारतीय मुस्लीम, मला शासन असलेल्या धर्माची गरज नाही”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More