ठाणे | मनसे प्रमुख राज ठाकरेंनी पाडव्याला केलेल्या भाषणानंतर राज्यात मोठा गोंधळ निर्माण झाला होता. त्यानंतर आता राज ठाकरेंनी ठाण्यातील सभेत या सभेवर टीका करणाऱ्यांना उत्तर दिलं आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर ठाकरेंनी टीका केली आहे.
मी अगोदरही खूप वेळा म्हणलोय की मस्जिदीवरील भोंग्यांमुळं सर्वांना त्रास होतोय. यामध्ये वादग्रस्त काय आहे. शहराच्या रस्त्यावर, फुटपाथवर का बसताय, आम्हाला विनाकारण त्रास देवू नका हे समजत नसेल तर आम्ही हनुमान चालीसा लावणार म्हणजे लावणार, असा निर्धार राज ठाकरेंनी केला आहे.
वयस्कर लोकांना, महिलांना, विद्यार्थ्यांना सर्वांना त्रास होत आहे. सर्वांना त्रास होत आहे, भोंग्याच्या विषयाचा एकदा सोक्षमोक्ष लागलाच पाहिजे. राज्य सरकारनं काय करायचं ते करावं आम्ही मागं हटणार नाही, असा इशारा राज ठाकरेंनी सरकारला दिला आहे.
दरम्यान, अजित पवार यांनी कोरोनानंतर माझं वक्तव्य ऐकलं आहे पण त्याअगोदर काय ऐकलं नाही का, असा सवालही ठाकरेंनी पवार यांना केला आहे.
थोडक्यात बातम्या –
“वसंत सेना ते पवार सेना असा शिवसेनेचा प्रवास”, संदीप देशपांडेंनी डिवचलं
वसंत मोरे ऑन फायर! चंद्रकातदादा म्हणाले, “वसंत तुम्ही भाजपात या, मी म्हणालो…”
“माझ्या नादाला लागायचं नाय, असे 100 जण तंगड्याला बांधून फिरते ही चित्रा वाघ”
“सदावर्तेंच्या तोंडाला काळं फासणाऱ्याला 50 हजार रूपये बक्षीस देणार”
रुपाली चाकणकर यांची चित्रा वाघ यांच्यावर घणाघाती टीका, म्हणाल्या…
Comments are closed.