बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळात फेरबदल?, ‘या’ दोन नावांची चर्चा

मुंबई | मागील काही दिवसांपासून ठाकरे सरकारच्या (Thackeray government) मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र, पावसाळी अधिवेशनानंतर देखील कोणताही निर्णय घेण्यात आला नव्हता. अशातच आता हिवाळी अधिवेशनापुर्वी मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता आहे. (Thackeray govt cabinet reshuffle likely)

या संभाव्य मंत्रिमंडळ फेरबदलात काँग्रेसमधून दोन नेत्यांची नावं चर्चेत आहेत. त्यामुळे आता एका काॅबिनेट मंत्र्याला आणि एका राज्यमंत्र्याला डच्चू मिळण्याची शक्यता आहे. या मुद्द्यावर परवानगीसाठी नाना पटोले दिल्लीला रवाना झाले आहेत.

मंत्रिमंडळाच्या या दोन पदांसाठी खुद्द नाना पटोले यांचं नाव समोर येत आहे. तर सुशील कुमार शिंदे यांच्या कन्या प्रणिती शिंदे यांना देखील संधी मिळण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर विधानसभा अध्यक्षांच्या नावावर देखील आज किंवा उद्या शिक्कामोर्तब होऊ शकतं.

दरम्यान, नाना पटोले यांनी विधानसभेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर ती जागा अद्याप रिक्तच आहे. अशातच आता नाना पटोले यांच्या दिल्ली दौऱ्यावर आता सर्वांचंच लक्ष लागलं आहे.

थोडक्यात बातम्या-

“राज्यातील रस्ते कतरिनाच्या गालासारखे गुळगुळीत असावेत”; राज्यमंत्र्यांचं वादग्रस्त वक्तव्य

“मी डंके की चोटपर सांगतोय, शरद पवारांनी विश्वासघात केला”

भारी काम झालं! रेशनधारक कुटुंबांसाठी मोदी सरकारची मोठी घोषणा

भर पत्रकार परिषदेत अनिल परब यांचा पडळकरांना टोला, म्हणाले…

एसटीचं विलीनीकरण नाहीच, कर्मचाऱ्यांचं निलंबन मात्र तातडीने रद्द होणार

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More