गांधीनगर | गुजरात विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस पक्षाला मोठा झटका बसला आहे. पाटीदार नेते हार्दिक पटेल यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे.
हार्दिक पटेलने आपल्या ट्विटर हँडलवरून राजीनाम्याची माहिती दिली. आज मी धैर्याने काँग्रेस पक्षाच्या पदाचा आणि पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे, असं त्यांनी म्हटलंय. मला खात्री आहे की माझ्या या निर्णयाचं माझे सर्व सहकारी आणि गुजरातचे लोक स्वागत करतील, असंंही हार्दिक पटेल म्हणालेत.
हार्दिक पटेल यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे राजीनामा पत्र सादर केलं. अनेक प्रयत्नांनंतरही काँग्रेस पक्षाने देश आणि समाजहिताच्या विरोधात केलेल्या कामामुळे मी पक्षाचा राजीनामा देत असल्याचे त्यांनी पत्रात लिहिलं आहे.
काँग्रेस पक्ष केवळ निषेधाच्या राजकारणात मोडला आहे. तर देशातील जनतेला विरोध नाही, तर भविष्याचा विचार करणारा पर्याय हवा आहे, असं ते म्हणालेत.
थोडक्यात बातम्या-
राज ठाकरेंनी पुण्यात दीड तासात खरेदी केली ‘इतक्या’ हजारांची पुस्तक!
“निवडून यायचं एकाच्या जीवावर अन् दुसऱ्यांची चाकरी करायची”
“भीती वाटत असेल तर आदित्य ठाकरेंसोबत अयोध्येला जा, माफीचीही गरज नाही”
मान्सून संदर्भात मोठी अपडेट; राज्यात ‘या’ दिवशी होणार पावसाचं दमदार आगमन
Comments are closed.