बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आंतरराष्ट्रीय कारकीर्दीतला पहिलाच चेंडू, अन् दिग्गज आर्चरला ठोकला षटकार; सूर्यकुमार म्हणतो…

अहमदाबाद | भारत आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या चौथ्या एकदिवसीय सामन्यात सुर्यकुमार यादवला संधी दिली गेली. या संधीचं सोनं करत त्याने भारताला विजय मिळवून दिला. त्याने च्या पहिल्याच चेंडूवर अफलातून षटकार ठोकला होता. त्यानंतर त्याने सामन्यानंतर त्याने केलेल्या या पराक्रमाचं रहस्य सांगितलं आहे.

शार्दुल ठाकूर यांने सामन्यानंतर सुर्यकुमार यादव याची मुलाखत घेतली. आम्ही तुला आयपीएलमध्ये असे शाॅट मारताना पाहिलं आहे. हा शाॅट तू कधी शिकलास? आणि आर्चरला शाॅट मारायची एवढी हिम्मत तुझ्यात कशी येते? असा प्रश्न शार्दुलने सुर्यकुमारला विचारला होता. त्यावर सुर्यकुमार म्हणाला, मी त्याला आयपीएल आणि इंटरनॅशनलमध्ये प्रत्येक वेळी बघत आलो आहे. नवीन फलंदाज आला की तो फलंदाजाला बॅकफूटवर ठेवायचा प्रयत्न करत असतो. त्याचबरोबर मी त्याच्या विरूद्ध मागील 2 ते 3 वर्ष आयपीएलमध्ये खेळत आलो आहे. त्यामुळं त्याची मला चांगलीच कल्पना आहे.

हा शाॅट मी खूप आधीपासून खेळत आलो आहे. लोकल क्रिकेट, डोमॅस्टीक क्रिकेट इतकच नाही तर क्रिकेट जेव्हापासून खेळत आलो आहे तेव्हापासून मी हा शाॅट खेळतो. या सामन्यात मी जास्त ताण घेतला नाही. पहिले दोन तीन चेंडू चांगले गेल्यावर पुढे खेळायला जास्त ताण आला नाही. त्याच बरोबर आयपीएल मध्ये सातत्याने खेळत असल्याने जास्त भिती देखील खेळताना मला वाटली नाही, असं सुर्यकुमार म्हणाला.

दरम्यान, प्रत्येक मॅच झाल्यावर भारतचा गोलंदाच यजुवेंद्र चहल सगळ्यांच्या मुलाखती घेत असतो. ‘चहल टीव्ही’ नावाचा त्याचा शो प्रसिद्ध आहे. यावेळी चहलला सुट्टीवर पाठवून शार्दुलने सुर्यकुमारची मुलाखत घेतली होती त्यावेळी त्याने हा खुलासा केला आहे.

पाहा व्हिडीओ –

 

Shree

थोडक्यात बातम्या-

मासिक पाळी दरम्यान तरुणीच्या डोळ्यातून वाहू लागलं रक्त, वाचा काय आहे प्रकरण

वडिलांच्या दुसऱ्या विवाहाला मुलगी न्यायालयात आव्हान देऊ शकते- मुंबई उच्च न्यायालय

नात्याला काळीमा फासणारी घटना; पॉर्न पाहून दारुड्या मुलानं आईवर केला लैंगिक अत्याचार

मानवी केसांनी भरलेले 2 ट्रक जवानांनी पकडले, एक किलो केसांची किंमत ऐकून थक्क व्हाल

अब्रू वाचवण्यासाठी माजी मंत्र्यांनी पळपुटेपणा केला- धनंजय मुंडे

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More