बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘ना सरकारी नोकरी, ना पासपोर्ट’; दगडफेक करणाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी सरकारने उचललं मोठं पाऊल

श्रीनगर | भारताचं नंदनवन म्हणुन ओळखलं जाणारं जम्मू काश्मीर कलम 370 रद्द झाल्यापासून हऴुहऴु कात टाकत आहे. जम्मू काश्मीरचं प्रशासन काही महत्वपुर्ण निर्णयांच्या माध्यमातून लोकाभिमुख होताना आपल्याला पहावयास मिळत आहे. याचाच एक भाग म्हणून आपण सरकारने काढलेल्या आदेशाकडे पाहु शकतो.

जम्मू काश्मीरमध्ये पसरलेल्या अशांततेचं सर्वात मोठं कारण तरुणांच्या हातात असणारे दगड हे होतं आणि आता याच दगडफेकींकडे लक्ष वेधणारा आदेश सरकारने दिलाय. “दगडफेक करणाऱ्यांना पासपोर्ट ना नोकरी ” हा आदेश काढून सरकारने नंदनवनाची शांतता भंग करणाऱ्यांना कारवाईचा इशारा दिलाय. संबंधित आदेशाची अंमलबजावणी ही राज्य गुन्हे अन्वेषण विभागामार्फत होणार आहे. या निर्णयामुळे दहशतवाद आणि हिंसक घटनांना खतपाणी घालणारी ही गोष्ट आता बंद होण्यास मदत होईल.

सरकारी कार्यालयांकडे जेव्हा एखादी व्यक्ती पासपोर्ट, नोकरीसाठी येईल तेव्हा सीआयडीचा अहवाल, परदेशी संघटनेशी संबंध असेल तर ती माहिती, राजकीय व्यक्तीशी संबंध असेल तर ती माहिती सरकारला देणं बंधनकारक असेल. भारताच्या सामाजिक, आर्थिक, राजकीय, शैक्षणिक प्रवाहात जम्मू काश्मीरला आणण्यासाठी सरकारच्या माध्यमातून विशेष प्रयत्न केले जात आहेत.

जम्मू काश्मीरमध्ये कमीत कमी 15 वर्षं राहणाऱ्या व्यक्तीलाच नागरिकत्वाचा दाखला मिळेल, असा नियम सरकारनं कलम 370 हटवल्यानंतर केला आहे. त्यानंतर आता यात आणखी एका नियमाचा समावेश करण्यात आला आहे. त्यानुसार राज्यात जन्मलेल्या महिलेसोबत एखाद्या व्यक्तीचं लग्न झालं, तर त्या व्यक्तीला जम्मू काश्मीर राज्याचं नागरिकत्व मिळू शकणार आहे.

थोडक्यात बातम्या-

संजय राठोडांशी ‘ती’ तब्बल 90 मिनिटे बोलली; पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर

कुणाला एवढी खूमखूमी आली असेल तर समोर या, स्वत:च्या पायावर याल पण…- संजय राऊत

भारतासाठी आणखी एक आनंदाची बातमी; महिला हाॅकी संघाची सेमीफायनलमध्ये धडक

विरोधकांच्या गोंधळामुळे केवळ 18 तास झालं संसदेचं कामकाज; इतक्या कोटींचं नुकसान

‘ही घ्या शिवसेनेच्या बाटग्यांची यादी’; राऊतांच्या अग्रलेखाला नितेश राणेंचं प्रत्युत्तर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More