देश

‘सर्वांना मोफत कोरोना लस देणार’; ‘या’ सरकारने केली मोठी घोषणा

नवी दिल्ली | विधानसभा निवडणुकीपूर्वी तामिळनाडू सरकारने एक मोठी घोषणा केली आहे. सर्वांना मोफत कोरोना लस देणार असल्याचं मुख्यमंत्री एडप्पादी के. पलानीस्वामी यांनी म्हटलंय.

आम्ही पूर्वी जाहीर केल्यानुसार सर्वांना कोरोना लस मोफत देऊ आणि तामिळनाडूला कोरोना व्हायरसपासून मुक्त करू, असं के. पलानीस्वामी यांनी म्हटलं आहे.

तामिळनाडू सरकारने शेतकऱ्यांनाही मोठी भेट दिली आहे. तामिळनाडू सरकारने विधानसभेत 12,110 कोटी रुपयांची कर्जमाफी जाहीर केली आहे.

राज्यात चक्रीवादळ वादळ, खराब हवामान आणि मुसळधार पावसाचा शेतीवर परिणाम होतो. तसेच त्याचा फटका शेतकऱ्यांना बसतो. त्यामुळे कर्जमाफीचा निर्णय घेण्यात आला असल्याचं के. पलानीस्वामी यांनी  म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या-

जिथे खिळे ठोकले, तिथे फुलं लावणार; राकेश टिकैत यांची घोषणा

आमचं चुकलं असेल तर माफ करा, पण…- नितीन राऊत

‘गावी सोडलेले आजोबा परत आले’; राकेश टिकैत यांनी 92 वर्षीय शेतकऱ्याला खांद्यावर घेतलं उचलून

“फडणवीसांच्या काळात देशात पेट्रोल डिझेलची सर्वाधिक किंमत महाराष्ट्रात होती”

“मोदी सरकारच्या हटवादीपणामुळे जगात भारताची नाचक्की होतीये”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या