बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘गिरीश महाजन यांना पैशांचा घमंड असल्यानं…’; रोहित पवारांची घणाघाती टीका

जळगाव | केंद्रीय तपास यंत्रणा सध्या राज्यात विविध ठिकाणी छापेमारी करत आहेत. राज्यातील महाविकास आघाडीतील नेत्यांवर ईडीनं मोठ्या प्रमाणात कारवाई केली आहे. एकेकाळचे भाजपचे मातब्बर नेते राहिलेले माजी मंत्री एकनाथ खडसे सध्या ईडीच्या रडारवर आहेत. काही महिन्यांपूर्वीच एकनाथ खडसे यांनी भाजप सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. परिणामी एकनाथ खडसे यांच्यावरील कारवाईमागं भाजपच्या एका नेत्याचा हात असल्याचा गौप्यस्फोट राष्ट्रवादीचे आमदार रोेहित पवार यांनी केला आहे.

रोहित पवार हे सध्या जळगाव दौऱ्यावर आहेत. जळगाव बॅंकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे यांच्यासह पवार यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना भाजप नेते गिरीश महाजन यांच्यावर जोरदार टीका केली आहे. एकनाथ खडसे हे मोठे नेते आहेत पण भाजपात असल्यापासून त्यांची ताकत कमी करण्याचे प्रयत्न भाजपमधील काही नेत्यांनी केले आहेत, असं रोहित पवार म्हणाले आहेत.

गिरीश महाजन यांना पैशांचा घमंड असल्यानं फोडाफोडीचं राजकारण ते करत आहेत, अशी टीका रोहित पवार यांनी केली आहे. एकनाथ खडसे राष्ट्रवादीत आल्यापासून त्यांना केंद्रीय तपास यंत्रणांनी त्रास देण्यास सुरूवात केल्याचं पवार म्हणाले आहेत. जळगाव जिल्ह्यातील बहुजन नेत्यांची ताकत कमी करण्याचं काम महाजन यांनी केल्याचं रोहित पवार म्हणाले आहेत.

दरम्यान, एकनाथ खडसे यांना भोसरी जमीन व्यवहार प्रकरणी ईडीच्या चौकशीला सामोरं जावं लागत आहे. नुकतंच उच्च न्यायालयानं खडसे यांना अटकेपासून वाचवलं आहे. खडसे यांनी गोपीनाथ मुंडे यांच्यासोबत भाजप वाढवण्यासाठी मोठी मेहनत घेतली होती पण त्यांनी भाजप आपल्यावर अन्याय करत असल्याचं सांगत पक्ष सोडला होता.

थोडक्यात बातम्या  

“अंबानी आणि संघातील एका व्यक्तीने मला 300 कोटींची लाच देण्याचा प्रयत्न केला”

मोठी बातमी! भीमा कोरेगाव प्रकरणात परमबीर सिंग आणि रश्मी शुक्ला यांना समन्स

‘बॅंक साताऱ्याची मग निर्णय पुण्यात का?’, उदयनराजेंचा ‘या’ तीन नेत्यांना सवाल

जेवणानंतर खाल्लेले अन्न पचत नाही?; मग वाचा ‘हे’ घरगुती आयुर्वेदिक उपाय

“हर्बल तंबाखूचा पहिला प्रयोग सदाभाऊंनी आपल्या शेतात करावा”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More