बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

भुकेल्या हत्तीने चक्क हेलमेट खाल्लं, पाहा व्हिडीओ

नवी दिल्ली | सोशल मीडियावर रोज कोणता ना कोणता व्हिडीओ व्हायरल होत असतो. अशातच कधी तरी कुठल्या तरी प्राण्याचा देखील व्हिडीओ व्हायरल होतो. अशातच एका हत्तीचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये हत्तीला भुक न आवरल्याने त्याने चक्क हेलमेट खाल्ला आहे.

व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये हत्ती रस्त्याच्या मधून चालताना दिसत आहे. अशातच रोडमध्ये एक दुचाकी देखील थांबलेली आहे. या दुचाकीच्या हँडलला एक हेलमेट देखील अडकवण्यात आलं आहे. गाडीवरील हेल्मेट हत्ती आपल्या सोंडेच्या मदतीनं खाली घेतो आणि यालाच आपलं भोजन समजून खाऊन घेतो. हा व्हिडिओ भारतीय वनसेवा अधिकारी प्रवीण अंगुसामी यांनी शेअर केला आहे.

हत्तीचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी यावर प्रतिक्रियाही दिल्या आहेत. एका युजरनं लिहिलं, की हेल्मेट खाणं त्यासाठी घातक ठरू शकतं. याचं उत्तर देत प्रवीण अंगुसामी यांनी लिहिलं, की हे हेल्मेट त्यानं उलटी करून बाहेर काढलं असणार, कारण ही एखादी लहान वस्तू नाही.

दरम्यान, अनेक युजर्सनं हत्तीसाठी चिंता व्यक्त केली आहे. काही दिवसांपुर्वी देखील गडचिरोली येथे एका तहानलेल्या हत्तीने स्वतः पाणी हापसलं होतं. तसेच पाणी हापस्तानाचा हत्तीचा व्हिडीओ बनवण्यात आला होता.

 

थोडक्यात बातम्या-

रेल्वे रुळावर बाईक स्टंट करायला गेला अन् अचानक ट्रेन आली, पाहा व्हिडीओ

ओबीसी आरक्षणावरून पंकजा मुंडेंचा ठाकरे सरकारवर गंभीर आरोप, म्हणाल्या…

आषाढी वारी संदर्भात अजित पवारांनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय!

कोरोना लस घेण्यास रामदेव बाबा तयार, म्हणाले,’डॉक्टर हे पृथ्वीवरील देवदूत’

‘हमीभाव दिल्याचा सरकारचा दावा कोणत्याही तज्ज्ञाने सिद्ध करून दाखवावा’; राजू शेट्टींचं आव्हान

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More