बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राज्यात हुडहुडी वाढली! स्वेटर, कानटोप्या, जॅकेट बाहेर काढा

मुंबई | सप्टेंबर महिन्यात पावसाने जोरदार हजेरी लावली होती. त्यानंतर आता नैऋत्य मोसमी वाऱ्याने पाठ फिरवल्यानंतर राज्यातील पावसाने उघडीप घेतली आहे. अशातच आता राज्यात हुडहुडी जाणवू लागली आहे. उत्तर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी थंडीचा जोर वाढत असल्याचं दिसून येतंय.

उत्तर महाराष्ट्रातील नाशिक आणि जळगाव जिल्ह्यात पारा खाली गेलेला दिसून येत आहे. नाशिकमध्ये आज तापमान 12.8 डिग्री सेल्सियस पर्यंत खाली आलं होतं. तर जळगावमध्ये देखील राज्यातील सर्वात निच्चांकी अशी 12 डिग्री सेल्सियसची नोंद झाली आहे. त्यामुळे आता स्वेटर, कानटोप्या, जॅकेट बाहेर निघण्यास सुरूवात झाली आहे.

कोकण आणि मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी सकाळी धुक्याची हलकी चादर दिसून येत आहे. त्यामुळे आता खऱ्या अर्थाने दिवाळी आल्याचं पहायला मिळतंय. राज्यातील अनेक शहरात आता पहाटे शेकोट्या पेटण्यास सुरूवात झाली आहे. हवामान बदलामुळे यंदाही पावसाप्रमाणे थंडीचाही प्रकोप पहायला मिळू शकतो.

दरम्यान, ऐन दिवाळीच्या तोंडावर पावसाचं सावट देखील आहे. 1 ते 3 नोव्हेंबरला राज्यातील दक्षिण कोकणात, दक्षिण मध्य महाराष्ट्रात आणि दक्षिण मराठवाड्याच्या काही भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे.

थोडक्यात बातम्या-

व्हायोलिनचा ‘स्वराधीन’ हरपला! ज्येष्ठ संगीतकार प्रभाकर जोग यांचे निधन

“छत्रपतींचा जयजयकार करायला लाज वाटते तो भंगारवाला आमच्यासाठी भंगारच”

न्यूझीलंडला नमवण्यासाठी विराटसेना सज्ज! दोन्ही संघासाठी ‘करो या मरो’ची लढाई

“मोदी सरकारचे मंत्री विनोदाच्या फुलबाजा पेटवतात मग माचीस, तेल, नोकऱ्या, पगार याचं काय?”

“मी छोटा पैलवान आहे, तुम्ही मला इतका सोपा समजू नका”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More