बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मास्क लाव सांगणं आलं अंगाशी, घडला ‘हा’ धक्कादायक प्रकार

रत्नागिरी| देशात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असल्यामुळे केंद्र सरकारने अनेक नियम लागू केले आहेत. या नियमांचे पालन न केल्यास दंड देखील लावण्यात आला आहे. अशातच एक विचित्र घटना समोर आली आहे. मास्क लाव असं सांगितल्यानंतर रागाने मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. संबंधित घटना ही चिपळूणची आहे.

संबंधित आरोपीचं नाव धोंडीबा येडगे असं आहे. मधुकर बाबाजी इंदूलकर यांनी धोंडीबा विरुद्ध तक्रार नोंदवली आहे.ते या मारहाणीत जखमी झाले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार यातील इंदूलकर हे कामानिमित्त पतसंस्थेत जात असताना त्या वेळी तालुक्‍यातील पोफळी नाका रिक्षा स्टॉप या ठिकाणी येडगे हा उभा होता.

इंदूलकर यांच्याजवळ येऊन धोंडीबा काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करीत असताना त्यांनी त्यास मास्क  लाव व नंतर माझ्याशी बोल, असे सांगितले. याचा येडगे याला राग आल्याने त्याने इंदूलकर यांना शिवीगाळ केली. यानंतर इंदूलकर हे पतसंस्थेत जाऊन पुन्हा परत घरी जात असताना येडगे याने त्यांना शिवीगाळ करून पाठीमागून येऊन हातातील लाकडी काठीने त्याच्या डोक्‍यात उजव्या बाजूस मारून दुखापत केली.

दरम्यान, या घटनेनंतर इंदूलकर यांनी येडगे विरोधात तक्रार दिल्यानुसार त्याच्यावर अलोरे शिरगाव पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. मात्र लोक नियमांचे पालन  करत नसल्याचं यातून दिसत आहे. तसेच नियमांचे पालन करा, असं सांगितल्यास देखील आता गुन्हे होऊ लागले आहे.

थोडक्यात बातम्या-

“कोरोना परिस्थिती हाताळण्यात भारतातील राजकीय नेतृत्व अपयशी ठरलं”

…अन् 25 वर्षीय महिलेनं एकाच वेळी दिला चक्क नऊ बाळांना जन्म

डाॅक्टरांना राक्षस संबोधन आलं अंगलट; कॉमेडियन सुनिल पालविरोधात गुन्हा दाखल

लाॅकडाऊनमध्ये सलग दुसऱ्या दिवशी पुणे शहर रक्ताच्या थारोळ्यात

…म्हणून अशोक चव्हाणांनी मानले खासदार संभाजीराजेंचे आभार

 

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More