बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

देशातील कोरोना रूग्णसंख्येत घट, पण मृतांचा आकडा चिंताजनक

नवी दिल्ली | देशभरात सध्या कोरोना संसर्गाचा आता उद्रेक पाहायला मिळत आहे. दररोज मोठ्या संख्येने कोरोनाबाधित रूग्ण आढळून येत असून, रूग्णांच्या मृत्यूंच्या संख्येतही मोठी भर पडताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर आता अनेक राज्यांमध्ये पुन्हा एकदा लाॅकडाऊन घोषित करण्यात आला आहे. प्रशासनाकडून निर्बंध अधिक कडक करण्यात येऊन देखील, रूग्ण संख्येतील वाढ सुरूच आहे. देशातील दरदिवशी वाढणाऱ्या कोरोनाबाधितांच्या आकडेवारीने अमेरिकेलाही मागे टाकलं होतं. पण आता काही प्रमाणात दिलासादायक चित्र समोर येत आहे.

देशात गेल्या 24 तासात कोरोना रूग्णसंख्येत घट झाल्याचं  पाहायला मिळालं. 24 तासात तब्बल 3 लाख 43 हजार 144 कोरोनाबाधित रूग्ण आढळले असून, मृत पावणाऱ्यांची संख्याही काही प्रमाणात वाढल्याचं पाहायला मिळालं, 24 तासात एकुण 4 हजार रूग्णांचा देशात कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आरोग्य यंत्रणा अपुरी पडत असल्याने देशात मृत्यू दरही झपाट्याने वाढत असल्याचं दिसून येत आहे. मागच्या 24 तासात देशात 3,44,776 रुग्ण कोरोनातुन बरे झाले आहेत. त्याचबरोबर, सध्या भारतात एकूण 37 लाख 04 हजार 893 सक्रिय रूग्णसंख्या आहे.

भारतात कोरोनामुळे मृत पावणाऱ्यांच्या संख्येने 2 लाखांचा टप्पा आधीच पार केला आहे. महाराष्ट्र सरकारने विचार करून बैठका घेऊन कोरोना रोखण्यासाठी कठोर पावले उचलत अखेर राज्यात लाॅकडाऊन घोषित केला, त्यानंतर आता महाराष्ट्रात कडक लाॅकडाऊन 31 मे पर्यंत वाढवण्यात आला आहे. पण केंद्र सरकारने लाॅकडाऊन हा शेवटचा पर्याय म्हणुन वापरण्यात यावा, असा सल्ला राज्यांना दिला आहे. महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्येही लाॅकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे.

संपुर्ण देशासह पुण्यातही कोरोनानं मोठ्या प्रमाणात थैमान घातलं असल्याचं दिसून येत आहे. देशातील सर्वाधिक रूग्णसंख्या ही एकट्या पुण्यात आहे. काल दिवसभरात पुण्यातुनही काही प्रमाणात धक्कादायक चित्र पाहायला मिळालं, दिवसभरात 2 हजार 393 कोरोनाबाधितांची नोंद झाल्याचं प्रशासनाकडुन स्पष्ट करण्यात आलं. त्यामुळे आता लाॅकडाऊनचा सकारात्मक परिणाम होणार? की रूग्णसंख्या वाढत जाणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

थोडक्यात बातम्या –

लशींच्या तुटवड्याला फक्त नरेंद्र मोदी जबाबदार; लसीकरणावरून असदुद्दीन ओवेसी यांची टीका, म्हणाले…

ऐकावं ते नवलच! फॅार्च्युनर गाडीतून वांग्यांची विक्री, पाहा व्हायरल व्हिडीओ-

“गाय मालकावर नाराज झाली, तरी ती खाटीकाच्या घरी जात नाही; आम्ही मोदींसोबत आहोत”

यशस्वी बिझनेसवुमन आणि टाइम्स ग्रुपच्या चेअरपर्सन पद्मभूषण इंदू जैन यांचं निधन

धनंजय मुंडेसोबतच्या नात्याचा पुस्तकातून करणार उलगडा; दुसऱ्या पत्नीची फेसबुक पोस्ट चर्चेत

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More