Top News देश

पंतप्रधान शेतकऱ्यांचा आदर करत नाहीत- राहुल गांधी

नवी दिल्ली | मोदी हे देशातील शेतकऱ्यांचा आदर करत नाहीत आणि वारंवार चर्चा करुन ते शेतकऱ्यांना थकवू पाहत आहेत, अशा शब्दात काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी कृषी कायद्यांवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला.

राहुल गांधी आणि काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी शुक्रवारी जंतर-मंतर येथे जाऊन पंजाबमधील जे गत ४० दिवसांपासून कृषी कायद्यांविरुद्ध आंदोलन करत आहेत. त्या संसद सदस्यांप्रती एकजूटता प्रकट केली. त्यावेळी राहूल गांधी बोलत होते.

कोरोनामुळे देशाचे नुकसान झाले. मात्र नुकसान तर कोरोनाच्या अगोदर झाले. वस्तुस्थिती ही आहे की मोदी आणि त्यांचे दोन- तीन उद्योगपती मित्र आपल्याकडून सर्वकाही हिसकावून घेत आहेत. हेच उद्योगपती सर्वकाही चालवत आहेत, असंही गांधी यांनी म्हटलं आहे.

शेतकऱ्यांना हे लक्षात यायला हवं की वेळकाढूपणा केला जात आहे आणि त्यांना थकवले जात आहे. एक शेतकरी मृत्युमुखी पडला काय, दोन काय अथवा शंभर काय मोदी यांना काहीच फरक पडत नाही. त्यांना असं वाटतं की, शेतकरी थकून जाईल आणि पळून जाईल. मात्र, त्यांनी लक्षात घ्यावं की, शेतकरी पळून जाणारा नाही. आपल्याला पळून जावं लागंल. आज शेतकरी, उद्या मध्यमवर्गीयांचा नंबर, असं राहूल गांधींनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या-

सेना-भाजपमध्ये बॅनरवॉर, सुपर संभाजीनगर बोर्डासमोर भाजपचा ‘नमस्ते संभाजीनगर’

राज्यात पहिल्या दिवशी ‘इतक्या’ कोरोना योद्ध्यांना मिळणार लस!

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडणार राज्यव्यापी कोरोना लसीकरणाचा लसीचा शुभारंभ

“संभाजीनगर म्हणा, नाहीतर धाराशिव म्हणा; याकडे मी गांभीर्यानं बघत नाही

“…म्हणून हेगडे देखील आता माझ्यावर आरोप करत असावेत”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या