पुणे महाराष्ट्र

क्रूरतेचा कळस! सांगवीत पोत्यामध्ये घालून भटक्या कुत्र्याला पेटवून दिलं…

पुणे | कुत्र्याला पेटवून दिल्याचा धक्कादायक प्रकार सांगवी येथे घडला आहे. तसेच एका कुत्र्याचा व दोन कावळ्यांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. त्यांच्यावर विषप्रयोग झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. लोकमतने या संदर्भातील वृत्त दिलंय.

विनोद राजन मुरार यांनी याबाबत सांगवी पोलिसांना माहिती दिली. पोलीस उपनिरीक्षक गणेश माने यांनी दिलेल्या माहितीनुसार, विनोद मुरार यांच्याकडील पाळीव कुत्रा जखमी होऊन व तोंडातून फेस आलेल्या अवस्थेत रविवारी त्यांच्या घरासमोर आला. त्यानंतर कुत्रा दगावला. त्याच्या सोबत असलेल्या दुसऱ्या कुत्र्याचा मुरार यांनी शोध घेतला. त्यावेळी दुसरा कुत्रा पवना नदी परिसरात आढळून आला.

एका पोत्यामध्ये घालून त्या कुत्र्याला पेटवण्यात आल्याचं दिसून आलं. त्यामुळे मुरार यांनी लागलीच पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

कुणीतरी अज्ञात व्यक्तीन खाद्यपदार्थांतून विषप्रयोग केला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला.

थोडक्यात बातम्या-

“संधीची वाटच पाहतोय, फडणवीसांच्या नेतृत्वाखाली नव्याने सरकार स्थापन करू”

“केंद्र सरकार आणि आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांमध्ये गडकरींनी मध्यस्थी करावी”

“उद्धव ठाकरे पुढे किती दिवस ते मुख्यमंत्री राहतील हे सांगता येत नाही”

“मी कोरोनाची लस घेणार नाही, कोरोनाचे किती अवतार येऊदे मला काही होणार नाही”

“‘त्या’ मध्यरात्री मला मुख्यमंत्र्यांचा फोन आला होता…’; विश्वास नांगरे पाटलांनी सांगितली अंदर की बात

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या