बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

जावई आणि सासू प्रेमसंबंधामुळे आले पळून, मात्र पुढे घडला अत्यंत धक्कादायक प्रकार

पुणे | लग्नाच्या काही काळानंतर नवरा-बायकोला आपला जोडीदार सोडून दुसऱ्या कोणावर तरी प्रेम झाल्याच्या अनेक घटना समोर येतात. मग या रागातून अनेक गुन्हे देखील होतात. मात्र आपल्याच पोटच्या पोरीच्या नवऱ्यासोबत प्रेमसंबंध असल्याची विचित्र घटना समोर आली आहे. विशेष बाब म्हणजे या प्रेमामुळे जावई आणि सासूने जे कृत्य केलं ते हैराण करणारं आहे.

कर्नाटकमधील बेळगाव येथील रहिवासी असणाऱ्या संबंधित महिलेच्या लेकीचं काही दिवसांपुर्वी असिफ आतार नावाच्या मुलासोबत विवाह झाला होता. काही काळ आनंदाचा गेला मात्र नंतर असिफ आणि त्याची सासू एकमेकांच्या प्रेमात पडले. यातून त्यांनी घरातून पळ काढला आणि दोघे सोबत पुण्याला आले. पुण्यातील बिबवेवाडी येथे दोघे राहत होते.

बिबवेवाडीमध्ये राहत असताना दोघांमध्ये सतत वाद होऊ लागला. संबंधित सासूचे नाव अनारकली महंमद तेरणे असं आहे. पळून आल्यानंतर असिफ पुण्यात मजुरीचं काम करू लागला. यातून त्यांचा उदरनिर्वाह सुरू होता. मात्र सततच्या वादाला वैतागून असिफने आपल्या सासू अर्थात आपल्या प्रेयसीचा गळा दाबून तिला संपवलं.

दरम्यान, सासूची हत्या केल्यानंतर असिफने घराला बाहेरुन कुलुप लावला आणि पुण्यातून फरार होण्याच्या तयारीत असताना त्याच्या मित्राला संपुर्ण घटना सांगितली. मात्र त्याच्या मित्राने तातडीने बिबवेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर फरार होण्याच्या तयारीत असलेल्या असिफला पोलिसांनी बेड्या ठोकल्या.

थोडक्यात बातम्या-

…अन् भर सामन्यात डेव्हिड वॅार्नर ढसाढसा रडला, फॅन्सही हळहळले!

धक्कादायक! पतीचा मृतदेह दिल्लीतील हाॅटेलमध्ये पडुन; पत्नी मात्र एकटीच परतली मायदेशी

देशातील कोरोनाबाधित रुग्णसंख्येत घट, जाणुन घ्या दिलासादायक आकडेवारी

“तुमच्या ‘तिसरी लाट’ या चित्रपटामध्ये मला मृतदेह मोजण्यासाठी स्पाॅट बाॅयचं काम द्या”

भारतात कोरोनामुळे जळणाऱ्या सरणावरून खिल्ली उडवणं ‘या’ पक्षाला पडलं महागात

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More