बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पोराचा वाढदिवस बापासाठी ठरला अखेरचा दिवस; तलावात गेले पोहायला अन्…, पाहा व्हिडिओ

नागपूर | नागपूरमध्ये एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे. मुलाचा वाढदिवस बापासाठी अखेरचा दिवस ठरला. हिंगण्यातील झिल्पी तलावावर वाढदिवस साजरा करण्यासाठी गेलेल्या बाप-लेकाचा मृत्यूू झाला आहे. सोमवारी ही घटना घडली होती. आता या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

नागपूर शहरातील यशोधरानगरमधील टिपू सुलतान चौकातील रहिवासी कुटुंब दुचाकीने तलावावर वाढदिवस साजरा करण्यासाठी आलं. यातील लहान मुलगा असिफचा वाढदिवस होता. वाढदिवस साजरा केल्यानंतर बाप-लेक मोहगाव तलावातील पाण्यात उतरले. मुलाचे वडील तलावात पोहत होते ते बुडू लागले. यानंतर घाबरलेल्या पत्नीने तलावात उडी घेतली आणि त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. आई-वडिलांना तलावात पाहून मोठा मुलगा शहबीननेही पाण्यात उडी घेतली. या दुर्देवी घटनेत 12 वर्षीय मुलगा शहबीन अब्दुल शेख आणि 35 वर्षीय वडील अब्दुल आसिफ शेख यांचा मृत्यू झाला.

सुदैवाने आई आसमा थोडक्यात बचावली. घटनेची माहिती मिळताच हिंगणा पोलीस आणि बचाव पथक तलावावर पोचले. पथकाने अथक प्रयत्न करून तलावात बुडलेल्यांचे मृतदेह बाहेर काढले. मात्र या घटनेत बापाचा आणि मुलाचा मृत्यू झाला.

दरम्यान, हा 4 मिनिटांचा हा व्हिडिओ असून सुरुवातीला ते दोघेही बुडत असताना दिसत आहे. यानंतर मोबाइल खाली ठेवल्याची शक्यता आहे. दरम्यान त्या वेळेही ओरडण्याचा आवाज येत आहे. व्हिडीओच्या शेवटी मुलाच्या रडण्याचा आवाज येत आहे.

 

थोडक्यात बातम्या- 

“लसीकरणासाठी राखून ठेवलेले ते 35 हजार कोटी गेले कुठे?”

“मुख्यमंत्र्यांचा कोकण दौरा म्हणजे केवळ ‘दर्शनाचा कार्यक्रम’”

सकारात्मक बातमी | महाराष्ट्रातील ‘या’ गावानं कोरोना रूग्णाला पाहिलंच नाही, एकालाही नाही झाली कोरोनाची लागण

दिलासादायक! पुण्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय घट, बरे होणाऱ्यांची संख्या दुपटीने वाढली

मोठी बातमी! राज्यातील ‘या’ महत्त्वाच्या जिल्ह्यात म्युकरमायकोसिसचे सर्वाधिक रुग्ण

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More