बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“शरद पवारांनी कोणाकोणाची जात काढली हे राज्याला माहितीये, भाजपने मला शहाणपणा शिकवू नये”

पुणे | पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेशचे अनेक शेतकरी दिल्लीच्या सीमेवर कृषी कायद्याविरोधात आंदोलन करत आहेत. नुकतेच या आंदोलनाला 7 महिने पुर्ण झाली आहेत. तरीही केंद्र सरकारने कोणतंही पाऊल मागं घेतलं नाही. या पार्श्वभूमीवर राजू शेट्टी यांच्यासमवेत राज्यातील इतर शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. त्या भेटीवर भाजपने टीका केली होती. त्यावर आता राजू शेट्टी यांनी प्रत्युतर दिलं आहे.

‘काय दिवस आलेत राजू शेट्टींवर, ज्या पवारांनी त्यांची जात काढली त्यांच्या खांद्यावर डोकं ठेवून त्यांना अश्रू ढाळावे लागत आहेत. नियतीचा सूड म्हणतात तो हाच..’, अशा शब्दात अतुल भातखळकर यांनी राजू शेट्टी यांच्यावर घणाघाती टीका केली होती. मुख्यमंत्री भेटत नसल्यानं त्यांनी  शरद पवारांकडे तक्रार केली होती. त्यावर अतुल भातखळकर यांनी टीका केली. या टीकेला राजू शेट्टी यांनी उत्तर दिलं आहे.

सत्ता नसल्यानं भाजपचे सगळे नेते कासाविस झाले आहेत. त्यांनी कोणाकोणाची जात काढली ते राज्याला माहिती आहे. त्यामुळे त्यांनी मला शहाणपणा शिकवू नये, असं प्रत्युतर राजू शेट्टी यांनी दिलं आहे. त्याचबरोबर त्यांनी राज्यपालांना देखील धारेवर धरलं आहे. राज्यपाल महोदय कामात असतात, त्यामुळे त्यांना विधानपरिषदेच्या नियुक्त 12 आमदारांच्या पत्रावर स्वाक्षरी करायला वेळ नसेल, अशी टीका देखील त्यांनी केली आहे.

दरम्यान, शरद पवारांच्या भेटीनंतर मुख्यमंत्र्यांनी राजू शेट्टी यांना बोलावून घेतलं आणि त्याचं म्हणणं ऐकून घेतलं होतं. केंद्र सरकारने केलेल्या तीनही कृषी कायद्याच्या विरोधातील ठराव येणाऱ्या विधानसभेत करावा, अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

थोडक्यात बातम्या-

देवेंद्र फडणवीसांच्या तिन्ही मागण्या महत्त्वाच्या, त्याबाबत कारवाई करा- राज्यपाल

दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी जुलैचा दुसरा आठवडा महत्त्वाचा, शिक्षणमंत्र्यांनी सांगितली निकालाची तारीख!

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र; करून दिली ‘ही’ आठवण

भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे ‘भारत बायोटेक’ला मोठा फटका; इतक्या कोटी डॉलर्सचा करार स्थगित

“शरद पवार मोठे आहेत हे मी मानत नाही, तुम्ही मानत असाल तर…”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More