Top News देश

सर्वोच्च न्यायालयाने फटाके बंदीच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका फेटाळली

कोलकाता | मुंबईप्रमाणे कोलकात्यात देखील फटांक्यावर बंदी आणण्यात आली आहे. कोलकाता उच्च न्यायालयाने गुरुवारी पश्चिम बंगालमध्ये सर्व प्रकारचे फटाके फोडण्यावर बंदी घालण्याचा आदेश दिला होता.

या बंदी विरोधातील निर्णयाला आव्हान देणारी याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र या आव्हान याचिकेला सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावलं आहे.

यावर निर्णय देताना न्यायाधीश डी.वाय.चंद्रचूड म्हणाले की, “आपले सण महत्त्वाचे आहेत, हे आम्हीही समजू शकतो. मात्र सध्या आयुष्यंच धोक्यात आहे. आणि सध्या जीवन वाचवण्यापेक्षा कोणतीही मोठी मूल्यं असू शकत नाहीत.”

दरम्यान कोलकात्याप्रमाणे मुंबईत देखील फटाक्यांवर बंदी घालण्यात आली आहे. केवळ लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सौम्य स्वरूपातील फटाके वाजवण्याची परवानगी महापालिकेकडून देण्यात आली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

…त्यावेळी मी माझी विकेट द्यायला हवी होती- रोहित शर्मा

“बिहारमध्ये शिवसेनेची जी अवस्था केली तशी महाराष्ट्रातंही संजय राऊत करतील”

निवडणूक हारणे हाच फक्त पराभव नसतो, जुगाड करुन आकडा वाढवणे हा विजय नसतो- शिवसेना

अलिबाग कारागृहात अर्णब गोस्वामींना फोन पुरवल्याप्रकरणी 2 पोलीस निलंबित

आयपीएलचं जेतेपद जिंकल्यानंतर मुंबईचं देवेंद्र फडणवीसांकडून कौतुक; म्हणाले…

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या