बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

तालिबान्यांचा गजब कारभार! चुकून शत्रू राष्ट्रालाच पाठवले कोट्यवधी रूपये

काबूल | जगाच्या चर्चेचा आणि चिंतेचा विषय म्हणून तालिबानला ओळखण्यात येतं. सध्या तालिबानी दहशतवाद्यांनी अफगाणिस्तानमध्ये सत्ता स्थापन केली आहे. पण सत्ता काबीज केली म्हणजे सर्व झालं असं होत नाही. अफगाणिस्तानची व्यवस्था चालवण्यासाठी तालिबानला आता पैशांची कमतरता भासायला लागली आहे. अशातच एक धक्कादायक घटना अफगाणमध्ये घडली आहे.

एक तर पैशांचा दुष्काळ अन् त्यात तेरावा महिना अशी परिस्थिती तालिबानची झाली आहे. तालिबाननं चुकून तब्बल 6 कोटी रूपये आपल्या दुश्मन राष्ट्राला पाठवले आहेत, अशी घटना समोर येतं आहे. तजाकिस्तान सरकारच्या खात्यावर ही रक्कम पाठवली गेल्याचं सध्या सर्वत्र बोललं जात आहे. परिणामी तालिबानच्या राज्यकर्त्यांचं सर्वत्र हसू होत आहे.

6 कोटी रूपये तालिबानकडून परत मागण्यात आले पण तजाकिस्ताननं ते देण्यास नकार दिल्याची चर्चा आहे. माजी राष्ट्रपती अशरफ घनी यांनी तजाकिस्तानमधील अफगाण दुतावासाला लोकांच्या कल्याणासाठी काम करण्याकरिता हे पैसे मंजूर केले होते. पण तालिबान सत्तेत आल्यानंतर हा करार रद्द करण्यात आला होता. तरीही हे पैसे गेल्यानं तालिबान राज्यकर्ते दुख:त आहेत.

दरम्यान, तालिबानला नोव्हेंबरपासून हालाकिच्या परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. परिणामी त्यांना हा पैसा फार महत्त्वाचा होता. पण घनी यांनी आपल्या कार्यकाळात निर्वासितांच्या शिक्षणासाठी या पैशांची तरतूद केली होती.

थोडक्यात बातम्या 

“…त्याची ठाकरे सरकारला जराही शरम वाटली नाही”, चंद्रकांत पाटलांचा हल्लाबोल

ममतांचा जलवा कायम! भाजपला धूळ चारत पुन्हा गड राखला

नानांसह ‘या’ दोन नेत्यांना हायकमांडकडून समन्स, लगोलग दिल्लीला बोलावलं

मोठी बातमी! माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना मोठा झटका

‘…म्हणून मुलींच्या लग्नाचं वय 18 वरून 21 वर्ष केलं’; मोदींनी सांगितलं कारण

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More