Top News महाराष्ट्र मुंबई

फडणवीस सरकारचा ‘हा’ निर्णयही ठाकरे सरकारने केला रद्द

मुंबई | फडणवीस सरकारने घेतलेल्या निर्णयांना ठाकरे सरकारने केराची टोपली दाखवली आहे. यामध्ये मेट्रो प्रकल्पाची आरे परिसरातील कारशेड कांजूरमार्गला हलवणे,  बदल्यांचे अधिकार पुन्हा जिल्हा परिषदेकडे अशे अनेक निर्णय ठाकरे सरकारने बदलले होते. यामध्ये आता आणखी एका निर्णयाची भर पडली आहे.

मुंबईतील मनोरा आमदार निवासस्थानाच्या पुनर्बांधणीच्या कामाला स्थगिती देण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे. फडणवीस सरकारच्या काळात
‘एनबीसीसी’ला मनोरा आमदार निवास्थानाच्या पुनर्बांधणीचे काम देण्यात आलं होतं.

मनोरा या नवीन इमारतीच्या पुनर्बांधणीचं काम गेले अनेक वर्ष चालू होतं. मात्र महाविकास आघाडी सरकारने आमदार निवास्थानाच्या पुनर्बांधणी निर्णयाला स्थगिती देत राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हे काम देण्यात आलं आहे.

दरम्यान, विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर आणि विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्तराधिकार समितीची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपसभापती नीलम गोऱ्हे, सार्वजनिक बांधकाममंत्री  अशोक चव्हाण आणि इ. मंत्री उपस्थित होते.

थोडक्यात बातम्या-

कोरोनानंतर भारतात आलाय रहस्यमय आजार; आकडी येऊन बेशुद्ध पडत आहेत लोक

‘राहुल गांधींना कोथिंबीर आणि मेथी मधला फरक तरी माहित आहे का?’; मुख्यमंत्र्यांची टीका

कोथरुडच्या सोसायटीत शिरला गवा; गवगवा झाल्यावर पुणेकरांची तोबा गर्दी!

धक्कादायक! प्रसिद्ध अभिनेत्रीची हॉटेलच्या रूममध्ये आत्महत्या

“…फुसकुली सोडून भाजपने स्वतःचीच अक्कल दिवाळखोरी जाहीर केली”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या