बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

बलात्कारानंतर आरोपीशी लग्न करण्यासाठी पीडितेची सर्वोच्च न्यायालयात धाव अन्..; चक्रावुन टाकणारा प्रकार

तिरुअनंतपुरम | भारतात बलात्काराच्या अनेक घटना होत असतात. अल्पवयीन मुलांवर लैंगिक अत्याचाराच्या बऱ्याच घटना समोर येत आहेत. या घटनांना आळा बसावा म्हणून भारतात लहान मुलांवर अत्याचार केल्यास पोस्को कायद्यांतर्गत कठोर कारवाई केली जाते. अशीच एक घटना केरळमध्ये घडली आहे.

मात्र, पीडितेने आता आरोपीशी लग्न करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतल्याची माहिती समोर येत आहे. हे प्रकरण 2018 सालचं असून रॉबिन वडक्कुमचेरी या 28 वर्षीय तरूणाने 17 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना केरळ येथे घडली होती. पण त्याच आरोपीशी लग्नगाठ बांधायचं त्या तरूणीने निश्चित केलं आहे.

न्यायालयाने आरोपीला तुरूंगवासाची शिक्षा दिली होती. मात्र, आता जामिनावर आरोपीची सुटका करावी, अशी मागणी पीडित तरूणीने सर्वोच्च न्यायालयाला केली आहे. शरीरसंबंध हे माझ्याच सहमतीने झाले होते, असं तरूणीने म्हटलं होतं. परंतु, तरूणी अल्पवयीन असल्याने पोलिसांनी पोस्को कायद्यानुसार आरोपीवर कारवाई केली होती.

अत्याचारानंतर तरूणीने एका बाळाला जन्म दिला आहे. त्यामुळे आरोपीशी लग्न करण्याचा निर्णय पीडित तरूणीने घेतलेला आहे. त्यामुळे न्यायालय या प्रकरणात नेमका काय निर्णय घेणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या

महाराष्ट्रातील कोरोना परिस्थितीत सुधारणा; पाहा आजचे सकारात्मक आकडे

शेतकऱ्यांसाठी खुशखबर! तब्बल 11 कोटी शेतकऱ्यांना मिळणार मोदी सरकारकडुन प्रत्येकी 2 हजार रूपये

बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाचं काम आमच्याच काळातलं, फडणवीसांचा ठाकरे सरकारवर निशाणा

#Tokyo_Olympic2021 कांस्यपदक मिळवुन पी.व्ही सिंधु ठरली दोन पदके मिळवणारी पहिली भारतीय महिला

पुणे कोरोनामुक्त होतंय! आज अवघ्या ‘इतक्या’ नव्या कोरोनाबाधितांची नोंद

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More