बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

भारतीयांचं सोनेरी स्वप्न पुर्ण होण्यामागील नीरजच्या मेहनतीचा व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल!

मुंबई | प्रत्येक भारतीयाच्या घरा-घरात चर्चा आहे ती म्हणजे नीरज चोप्रा या ऑलिम्पिकवीर खेळाडूची. नीरजने तशी कामगिरीही केली आहे. 2021 च्या ऑलिम्पिकध्ये भारताला भालाफेकमध्ये सुवर्णपदक मिळवून दिलं आहे. नीरजने विक्रमी भाला फेकत इतिहास रचला आहे.

नीरजचं सर्व देशभरात कौतुक होत आहे मात्र त्याच्या या यशामागे त्याची मेहनतही तशा दर्जाची आहे. नीरजने आज पदक मिळवलं असं तरी त्याची मेहनत खूप दिवसांपासून चालू होती. नीरजची ही साधना आज खऱ्या अर्थाने फळाला आली आहे.

नीरजचा सध्या सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. त्यामध्ये तो भालाफेकचा सराव करताना दिसत आहे. एका व्हिडीओमध्ये नीरजची लवचिकता दिसून आली आहे. नीरज पूर्णपणे मागील बाजूला झुकला असून त्याची पाठ सरळ असलेली दिसत आहे. नीरजच्या सोशल मीडिया अकाऊंटवर चाहते मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. त्यासोबतच नीरजचं एक जुन ट्विटसुद्धा व्हायरल झालं आहे.

दरम्यान,  जेव्हा जिंकण्याची इच्छा तुम्हाला झोपू देत नाही, जेव्हा मेहनतीशिवाय तुम्हाला काहीचं चांगलं वाटत नाही. तुम्हाला सतत मेहनत करूनही थकवा येत नाही तेव्हा समजून जा तुम्ही इतिहास रचणार आहात, असं नीरजने म्हटलं होतं.

थोडक्यात बातम्या-

“तुम्हाला मेहनतीचा जेव्हा थकवा येत नाही तेव्हा समजून जा तुम्ही इतिहास रचणार आहात”

देशात 4 लाख 12 हजार123 सक्रीय रूग्ण तर…; वाचा ताजी आकडेवारी

…अन् तिचं स्वप्न अधूरंच राहिलं; राष्ट्रीय स्तरावरील खेळाडूला विकावं लागतंय पार्किंग तिकीट!

जेवढ्या गाई तेवढचं तूप विकतो, आम्ही रामदेव बाबांसारखं करत नाही- विजय वडेट्टीवार

आनंद महिद्रांनी नीरज चोप्राची केली बाहुबलीशी तुलना; म्हणाले….

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More