बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अखेर प्रतिक्षा संपली! ‘बिग बाॅस मराठी 3’ लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला

मुंबई | प्रेक्षकांचा आवडता कार्यक्रम ‘बिग बाॅस मराठी’च्या तिसऱ्या पर्वाला लवकरच सुरुवात होणार आहे. बिग बॉस मराठी या कार्यक्रमाचे आतापर्यंतचे सिझन चांगलेच गाजले आहेत. अशातच नुकतच ‘बिग बॉस मराठी 3’ची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे चाहत्यांमधील उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

महेश मांजरेकर यांनी या कार्यक्रमाचा टीझर शेअर करत त्यासोबत लिहिले आहे की, त्याच्यासोबत मी परत येतोय. तुम्ही तयार राहा. #BiggBossMarathi3 लवकरच #ColorsMarathi वर.

कलर्स मराठीनेही त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर व्हिडीओ शेअर करत बिग बॉस मराठी 3 लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं सांगितलं आहे. ‘दार परत उघडणार आणि एकच आवाज घुमणार, कारण येतोय बिग बॉस 3. लवकरच कलर्स मराठीवर’.

दरम्यान, दिग्गज अभिनेते-निर्माते महेश मांजरेकर ‘बिग बॉस मराठी’चे सूत्रसंचालन करतात. मांजरेकरांच्या स्टाईलचे अनेक चाहते आहेत. त्यामुळे पुढील सिझनची सूत्रंही मांजरेकरांच्याच हाती सोपवली जाणार आहेत. दोन वर्षापासून ‘बिग बॉस’चा मराठमोळा आवाज नव्याने ऐकण्यासाठी प्रेक्षकांने कान आसुसले आहेत.

 

थोडक्यात बातम्या – 

काय सांगता! आता केवळ आवाजाने चार्ज होणार MIचा स्मार्टफोन

जगातील सर्वाधिक लोकप्रिय वेबसीरिज म्हणून ‘द फॅमिली मॅन-2’च्या नावे नवा विक्रम

“मेंदू तल्लख आणि कार्यक्षमता निर्माण करणारे एखादे आसन मुख्यमंत्र्यांना सूचवा”

“विरोधी पक्षाची मोट बांधण्याचा पवारांचा हा काही पहिलाच प्रयत्न नाही”

बलात्कारासाठी महिलांचे कपडेच जबाबदार – इम्रान खान

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More