बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

स्वत:च्या लग्नाची पत्रिका देण्यास गेलेल्या नवरदेवाचा बाईक अपघातात मृत्यू!

औरंगाबाद | स्वतःच्या लग्नाची पत्रिका वाटण्यासाठी गेलेल्या नवरदेवाला अज्ञात वाहनाने धडक दिली. यात नवरदेवाचा मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेमुळे नांदेडमदील हिमायतनगर तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मृत झालेल्या नवरदेवाचं नाव उत्तम आहे. अवघ्या 25 वर्षाचा असलेला हा तरुण आपल्या लग्नाची पत्रिका नातेवाईकांना देण्यासाठी नांदेडला मोटर साईकल वरुन गेलेला. मात्र रात्र झाली तरी परत न आल्याकारणाने त्याच्या घरातल्यांनी त्याचा शोध चालू केला.

दुसऱ्या दिवशी पाहटे भोकर फाट्याजवळ एका वाहानाने तरुणाला धडक दिल्यामुळे त्या तरुणाचा अपघात झाल्याची घटना समोर आली. ही माहिती समोर येताच बारड येथील महामार्ग सुरक्षा पथकाने पाहणी केली. तपास केल्यानंतर तो तरुण उत्तम असल्याच समोर आलं.

दरम्यान, धडक दिलेल्या गाडीची माहिती अद्दाप समोर आलेली नाही. मात्र उत्तम च्या भावाने या प्रकरणाबाबत गुन्हा दाखल केला आहे. या कारणामुळे आता अज्ञात गाडीचा शोध लावण्याचं मोठं आव्हान आर्धापूर पोलिसांसमोर आहे.

थोडक्यात बातम्या-

मुलाचं लग्न बघायचं त्यांच्या नशिबातच नव्हतं, 5 दिवस आधीच आई वडिलांना ट्रकनं चिरडलं

“रिषभ पंतला खेळताना पाहिलं की मला माझे सुरुवातीचे दिवस आठवतात”

रुग्णांच्या जीवाशी खेळ सुरु, पुण्यातील रुग्णालयाची संभाजी ब्रिगेडकडून लाईव्ह पोलखोल

पुण्यात रुग्णांना बेड मिळेना; कोरोना पॉझिटिव्ह आईने मुलासमोर रस्त्यावरच सोडले प्राण

वाढत्या कोरोनामुळे ‘या’ जिल्ह्यातील सर्व शाळा बंद ठेवण्याचा निर्णय!

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More