Top News देश

“…तर 2014 च्या निवडणुकांमध्ये काँग्रेसला पराभवाला पाहावा लगला नसता”

नवी दिल्ली |  मागील काही निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाला सतत पराभवाला सामोरं जाव लागतं आहे. या पराभवासाठी काँग्रेस नेतृत्वाला जबाबदार धरण्यात येत आहे. आता या सर्वात दिवंगत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या पुस्तकावरून पुन्हा एकदा काँग्रेसच्या नेतृत्वावर प्रश्न उपस्थित होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

२००४ मध्ये प्रणव मुखर्जी यांच्याकडे पंतप्रधान पदाची धुरा सोपवली असती तर २०१४ मधील लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसला पराभव पाहावा लागला नसता असं काही नेत्यांचं मत होतं, असा दावा प्रणव मुखर्जी यांनी आपलं पुस्तक ‘द प्रेसिडेन्शिअल ईयर्स’मध्ये केला आहे.

पुस्तकात प्रणव मुखर्जी म्हणाले की, “माझ्या पक्षातील काही सदस्यांचे असे मत होते की २००४ मध्ये जर पंतप्रधान असतो तर २०१४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसवर दारूण पराभव ओढवला नसता. परंतु या मताशी मी सहमत नाही. मी राष्ट्रपती पदी विराजमान झाल्यानंतर पक्ष नेतृत्वानं राजकीय दिशा गमावली. सोनिया गांधी पक्षातील प्रकरणं हाताळण्यास असमर्थ ठरत होत्या तर मनमोहन सिंग यांची संसदेतील मोठ्या अनुपस्थितीमुळे खासदासांशी त्यांच्या वैयक्तिक संबंधांवरही पूर्णविराम लागला”.

प्रणव मुखर्जी यांचे ८४ व्या वर्षी निधन झाले. त्यांनी निधनापूर्वी हे पुस्तक लिहिलं असून ‘रूपा’ प्रकाशनद्वारे ते जानेवारी महिन्यात प्रकाशित करण्यात येणार आहे. या पुस्तकातील काँग्रेस संबंधातील त्यांनी केलेली टीका अशावेळी समोर आली आहे जेव्हा काँग्रेसमधीलच काही अंतर्गत वाद समोर येत आहे.

थोडक्यात बातम्या-

शेतकऱ्यांच्या आंदोलनावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले…

ग्रामपंचायत निवडणुका घोषित; 14 हजार 234 ग्रामपंचायतींसाठी ‘या’ तारखेला होणार मतदान

“महिला स्वतःच्या मर्जीने प्रेमसंबंध बनवून त्यानंतर बलात्काराचा आरोप करतात”

पंकजा मुंडेंनी घटवलं तब्बल 14 किलो वजन; पाहा कसं आहे डेली रुटीन!

‘नव्या कृषी कायद्यांचा उद्योगपतींनाच जास्त फायदा’; जागतिक बँकेच्या माजी अर्थतज्ज्ञांचं मत

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या