मुंबई | सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत चालला आहे. कोरोनाग्रस्तांचा आकडाही वाढत्या आलेखाप्रमाणे आणखीनच वाढत आहे. सरकारने कोरोनाला आळा घालण्यासाठी जिल्ह्यात संचारबंदी आणि अशत: लॉकडाऊनचे आदेश दिले आहेत. अशातच भाजपचे नेते गिरीष महाजन यांना कोरोनाची लागण झाली आहे. यासंदर्भात त्यांनी ट्विट करत माहिती दिली आहे.
दोन दिवसांपूर्वी ताप आल्यानंतर कोरोणा चाचणी केली असता, मला कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झालं आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घरीच क्वारंटाईन होऊन उपचार घेत होतो. पुढील उपचारासाठी लवकरच मुंबई येथील सेंट जॉर्ज शासकीय रुग्णालयात दाखल होत असल्याचं गिरीष महाजन यांनी सांगितलं.
गेल्या तीन-चीर दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्यांनी कोरोनाची चाचणी करून घ्यावी, अशी माझी विनंती आहे, असं आवाहनही गिरीष महाजनही यांनी केलं आहे. आपलं सर्वांचे प्रेम आणि आशीर्वाद पाठीशी आहेतच, लवकरच नव्या जोमाने आपल्या सेवेत दाखल होईल, असंही महाजन म्हणाले. तर याआधी दोन दिवसांपूर्वी पुण्याचे विभागाीय आयुक्त सौरभ राव यांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला होता.
दरम्यान, भाजपचे संकटमोचक म्हणून ओळख असलेल्या गिरीश महाजन यांना कोरोना झाला आहे. त्यामुळे आता त्यांच्या संपर्कात आलेल्यांनादेखील क्वारंटाईन व्हावं लागणार आहे.
दोन दिवसांपूर्वी ताप आल्यानंतर कोरोणा चाचणी केली असता, मला कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घरीच क्वारंटाईन होऊन उपचार घेत होतो. पुढील उपचारासाठी लवकरच मुंबई येथील सेंट जॉर्ज शासकीय रुग्णालयात दाखल होत आहे.
— Girish Mahajan (@girishdmahajan) March 18, 2021
थोडक्यात बातम्या-
सुर्यकुमारला संधी का दिली नाही हे मला काही कळलं नाही – गौतम गंभीर
न्यूड फोटोशूटमुळे चर्चेत आलेल्या मराठी अभिनेत्रीने पुन्हा शेअर केले आपले बोल्ड फोटो!
भाजपचे विद्यमान नगरसेवक संजय भोपी यांचं कोरोनामुळे निधन!
अमित ठाकरेंनी शिक्षक आंदोलकांना दिलेला ‘तो’ शब्द पाळला!
उद्योजक-व्याख्याते शरद तांदळे यांच्या ‘या’ व्हिडीओमुळे वारकरी संतप्त, पाहा व्हिडीओ
Comments are closed.