कोलकाता | नंदीग्राम येथील हल्ल्यात ममता बॅनर्जी यांच्या हाडांना गंभीर दुखापत झाल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या त्यांना यंदा प्रचाराच्या रणांगणाबाहेर रहावं लागण्याची शक्यात आहे. ममता यांना कोलकाताच्या एसकेएम हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. त्यांचा डावा पाय संपूर्णपणे प्लॅस्टरमध्ये आहे. त्यामुळे ममता बॅनर्जी प्रचारात न उतरल्यास तृणमूल काँग्रेसला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
एसकेएम रूग्णालयातील वरिष्ठ डाॅक्टरांनी ममता बॅनर्जी यांना मोठी दुखापत झाल्याची माहिती दिली आहे. एक्स रे आणि इतर चाचणीद्वारे त्यांच्या डाव्या पायाचा घोटा, उजवा खांदा, दंड आणि मानेच्या हाडाला जबर मार लागल्याची माहिती दिली आहे.
ममता बॅनर्जी या आजपर्यंत जनतेचा आवाज बुलंद करत आल्या आहेत आणि कायम करत राहतील. त्यांचा आवाज शांत करण्यासाठी या आधीही बरेच प्रयत्न केले गेले आहे, असं तृणमूल काँग्रेसच्या वतीने जारी करण्यात आलेल्या निवेदनात म्हटलं आहे. यापूर्वी शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी ऐतिहासिक आंदोलनाच्यावेळी देखील ममता बॅनर्जी यांच्यावर हल्ला झाला होता. मात्र, कोणत्याही हल्ल्यामुळे त्या मोडून पडल्या नाहीत, असंही त्यात म्हटलंय.
ममता बॅनर्जी यांची दुखापत बघता त्या राज्यभरात फिरून प्रचारसभा घेऊ शकतील का? याबाबत जरा शंका आहे. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारखा प्रतिस्पर्धी आणि भाजपच्या आक्रमक प्रचार यंत्रणेवर कुरघोडी करण्यासाठी ममता बॅनर्जी यांना प्रत्यक्ष मैदानात उतरून प्रचार करणं तृणमूल काँग्रेससाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण, गेल्या काही काळात भाजपने तृणमूलचे बरेच प्रमुख नेते भाजपच्या गळाला लागले आहेत. कधी नव्हे ती पश्चिम बंगालची निवडणूक एवढी अटीतटीची होणार आहे, त्यामुळे यावेळी तृणमुलचा कस लागणार असल्याचं दिसतंय.
थोडक्यात बातम्या –
अखेर माय-लेकीची भेट झाली… पाकिस्तानातून आलेल्या ‘त्या’ मुलीला साडेचार वर्षांनी कळलं खरं नाव
विजय हजारे ट्रॉफीत पुन्हा ‘पृथ्वी’ वादळाचा तडाखा; गोलंदाज हतबल होऊन पाहातच राहिले!
सेक्स न करताच तरुणी प्रेग्नंट झाल्यानं खळबळ, डॉक्टरही झालेत हैराण
आयपीएलला प्राधान्य देणाऱ्या खेळाडूंवर कारवाई व्हावी; ‘या’ खेळाडूच्या मागणीनं खळबळ
मंत्री बाळासाहेब थोरातांच्या बंगल्यातच आत्महत्येचा प्रयत्न झाल्यानं मोठी खळबळ
Comments are closed.