नवी दिल्ली | आपला देश कोरोनाच्या संकटाशी लढतो आहे. अशात कुणीही राजकारणाचा डमरु वाजवू नये, असं म्हणत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अप्रत्यक्षपणे राज्यातील भाजप नेत्यांचे कान टोचले आहेत.
एखादा मुद्दा पटला नसेल तर त्याबाबत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करा. सध्याची वेळ ही एकजुटीने करोनाच्या संकटाचा सामना करण्याची आहे, असं नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे.
सध्या देश कोरोनाच्या संकटाशी लढतोय. हे संकट हे देशावरचं सगळ्यात मोठं संकट आहे. या संकटात राजकारण करणं गैर आहे. राष्ट्रकारण आणि विकास यांना महत्त्व दिलं पाहिजे. प्रत्येक संवेदनशील नेत्याने ही बाब लक्षात ठेवली पाहिजे, असंही नितीन गडकरी यांनी सांगितलं.
दरम्यान, कोरोनाची स्थिती ही गंभीर आहे. मात्र आपण कोरोनाचा सामना नेटाने करतो आहोत. आपल्या देशाने बरंच नियंत्रण मिळवलं आहे, असं नितीन गडकरी यांनी सांगितलं आहे.
ट्रेंडिंग बातम्या-
“पालघर प्रकरणी 8 तासांत 101 आरोपी ताब्यात, त्यात एकही मुस्लिम नाही, जातीचं राजकारण करू नका”
मंत्री जितेंद्र आव्हाड रूग्णालयात दाखल
महत्वाच्या बातम्या-
‘भारतात विकासाचं चक्र पुन्हा गती घेईल’; नितीन गडकरींनी व्यक्त केला विश्वास
आमचा उद्धव ठाकरेंच्या नियुक्तीला विरोध नाही- चंद्रकांत पाटील
केंद्राचा मोठा निर्णय! डॉक्टरांवर हल्ला केल्यास दाखल होणार अजामीनपात्र गुन्हा
Comments are closed.