महाराष्ट्र मुंबई

कोरोनाग्रस्तांवर उपचारांसाठी तीन प्रकारची वेगवेगळी रुग्णालयं; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

Loading...

मुंबई | राज्यात कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या दररोज वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना बाधितांवर चांगले आणि प्रभावी उपचार करता यावेत यासाठी महत्वाची घोषणा केली आहे. कोरोनाग्रस्तांवर उपचारांसाठी चार भागांमध्ये आरोग्य सेवेची विभागणी करण्यात आली आहे.

ज्यांना सर्दी, खोकला, ताप ही लक्षणं असतील त्यांनी खासगी दवाखान्यात न जाता क्युअर क्लिनिकमध्ये जावं. प्रत्येक विभागात ही क्लिनिक असतील. त्याची माहिती देण्यात येईल, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

ज्यांच्यामध्ये कोरोनाची सौम्य लक्षणे असतील त्यांच्यासाठी एक वेगळं हॉस्पिटल असेल. थोडया जास्त प्रमाणात कोरोनाची लक्षणे असलेल्यांसाठी दुसरं हॉस्पिटल असेल आणि ज्यांच्यामध्ये कोरोनाची अतीतीव्र लक्षणं आहेत तसेच उच्च रक्तदाब, मधुमेह किडनी असे अन्य आजारही आहेत त्यांच्यासाठी तिसरं रुग्णालय असेल, असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं आहे.

दरम्यान, वैद्यकीय क्षेत्रात ज्यांनी काम केलं आहे. लष्करात वैद्यकीय सेवा बजावलेल्या व्यक्तींना कोरोनाग्रस्तांवर उपचारासाठी मदत करायची असेल तर त्यांनी [email protected] वर संपर्क करा. महाराष्ट्राला तुमची गरज आहे, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलंय.

 

Loading...

 

ट्रेंडिंग बातम्या-

डोनाल्ड ट्रम्प यांची WHO ला धमकी, म्हणाले…

कोरोनाचा संसर्ग वाऱ्याच्या वेगाने पसरतोय; देशातली बाधितांची संख्या पोहचली 5 हजारांवर

महत्वाच्या बातम्या-

“केंद्राने जे दिलंय ते वाटतोय, पण केंद्राने सगळंच दिलंय असा गैरसमज नको”

…म्हणून भाजप नेते किरीट सोमय्या यांना पोलिसांनी केलं अटक

‘ट्रोलर्सच्या पाठीमागे फडणवीस अन् डावखरे तर नाहीत ना?’; आव्हाड प्रकरणावरून राष्ट्रवादी युवक आक्रमक

Loading...

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या