बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पुण्यात थरार! एकतर्फी प्रेमातून युवकाने केला गोळीबार

पुणे | गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील गुन्हेगारीचं प्रमाण वाढलं असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. पुण्यातील गुन्हेगारीचं प्रमाण वाढलं असतानाच किरकटवाडी फाटा येथे एकतर्फी प्रेमातून प्रियकराने गोळीबार केल्याची घटना घडली आहे. बुधवारी दुपारच्या दरम्यान हा सर्व प्रकार घडला असून हवेली पोलिस ठाण्यात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अक्षय उर्फ रावण चंद्रकांत दुबे असं अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव असून कोल्हेवाडीतील 45 वर्षीय व्यक्तीने त्याच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. बुधवारी दुपारी तक्रारदार व्यक्ती कोल्हेवाडीतील हॉटेल मुक्ताई येथे येऊन त्यांनी आमच्या नात्यातील महिलेला त्रास का देतो? आणि त्यांच्या घरी खाण्याचे पदार्थ आणि मोबाईल का पाठवलेस?, असं आरोपी दुबेला विचारलं.

दरम्यान, या विषयावरून दुबे आणि तक्रारदार व्यक्ती यांच्यात शाब्दिक चकमक झाली आणि त्याचं रुपांतर झटापटीत झालं. त्यानंतर आरोपी अक्षय दुबे याने फिर्यादीवर पिस्तूल ताणून धरली. त्यानंतर तक्रारदार तक्रार देण्यासाठी पोलिस स्टेशनकडे निघाले असताना किरकटवाडी फाट्यावर त्यांची गाडी अडवून त्यांच्यावर गोळीबार करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला.

या घटनेनंतर हवेली पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सदाशिव शेलार यांनी मिळालेल्या तक्रारीवरून आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला असून त्याला अटक करण्यात आली आहे. दरम्यान, ही सर्व घटना एकतर्फी प्रेमातून झाल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.

थोडक्यात बातम्या

‘किस काॅन्ट्रोव्हर्सी’ला विसरुन राखी सावंत आणि मिकानं घेतली गळाभेट, म्हणाले…., पाहा व्हिडीओ

चक्क एका कोंबडीने मगरीला कसा दिला चकवा, पाहा मजेशिर व्हिडीओ

‘महाराष्ट्र झोपेत असताना हे सरकार पडणार’; चंद्रकांत पाटलांचं मोठं वक्तव्य

पत्नीच्या चारित्र्यावर पतीला आला संशय अन् घडला ‘हा’ धक्कादायक प्रकार

जालन्यात डीवायएसपी आणि सात ते आठ पोलिसांचा भाजप पदाधिकाऱ्याला मारतानाचा व्हिडीओ व्हायरल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More