बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

चिंता वाढली! देशातील कोरोना रूग्णसंख्येत पुन्हा वाढ; पाहा आकडेवारी

नवी दिल्ली | देशात गेल्या तीन महिन्यांपासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने अक्षरशः हाहाकार माजवलेला पाहायला मिळत होता. वाढती रुग्णसंख्या हा चिंतेचा विषय बनला असतानाच देशातील कोरोनाबाधित रूग्न बरे होत असल्याचं दिलासादायक चित्र देखील पाहायला मिळत आहे. त्यातच आता कोरोनाच्या नव्या डेल्टा प्लस विषाणूने डोकं वर काढलं असतानाच गुरुवारी देशात कोरोना रुग्णसंख्येत वाढ झाल्याचं दिसून आलं आहे.

देशभरात काल 46 हजार 617 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या काही दिवसात हळूहळू कमी कोरोना रुग्णांची नोंद होत असल्याचं दिसून येत असतानाच आता रूग्णसंख्या वाढल्याने चिंतेत भर पडली आहे. त्याचबरोबर काल 59 हजार 384 कोरोनाबाधित रुग्ण कोरोनामुक्त होऊन रुग्णालयातून आपल्या घरी परतले आहेत.

काल देशभरात 853 कोरोनाबाधित रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तसेच आत्तापर्यंत देशभरात 4 लाख 312 जणांना कोरोनामुळे आपला प्राण गमवावा लागला आहे. देशभरात सध्या 5 लाख 9 हजार 637 सक्रिय कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

तसेच आत्तापर्यंत 3 कोटी 4 लाख 58 हजार 251 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. भारतात 34 कोटींहुन अधिक नागरिकांना कोरोना लस देण्यात आली आहे. तसेच लसीकरणात जागतिक पातळीवर भारताने विक्रम नोंदविला आहे आणि देशातील सर्वाधिक लसीकरण हे महाराष्ट्रात करण्यात आल्याचं नुकतंच स्पष्ट झालं आहे.

थोडक्यात बातम्या – 

मामाच्या साखर कारखान्यावर ईडीची कारवाई होताच अजित पवार म्हणाले…

‘अजितदादा आणि पक्षाला बदनाम करण्यासाठी…’; नवाब मलिकांचा भाजपवर गंभीर आरोप

तुमचं सिलेंडर आमच्या घराच्या सुखसमृद्धीत आणि शांतीमध्ये आग लावत असेल तर…- जयंत पाटील

ठाकरे सरकार पाडण्याचा नाही तर आम्ही दुसराच प्लॅन आखतोय, दानवेंनी भाजपचं सिक्रेट फोडलं!

‘मी आपणासही विनंती करु इच्छितो की…’; उद्धव ठाकरेंचं राज्यपालांना रोखठोक उत्तर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More