…तर जलसंपदाचे कार्यालय पेटवून देऊ- शिवसेना नेता

सातारा | केंद्रीय जलआयोगाच्या बैठकीत जिहे-कटापूर योजनेसाठी भरीव निधी मंजूर होईल, अशी आशा आहे, जर तसं झालं नाही तर शिवसेना कार्यकर्ते जलसंपदा विभागाचे कार्यालय पेटवून देतील, असा इशारा शिवसेना नेते नरेंद्र पाटील यांनी दिला आहे.

या योजनेबाबत आजवरचा शासनाचा अनुभव फार चांगला नाही. उद्या केंद्रीय जल आराखड्यास मान्यता न मिळाल्यास शिवसेना गप्प बसणार नाही, असंही ते म्हणाले.

दरम्यान, जर निधी मंजूर झाला नाहीतर पाण्याअभावी पिचलेला आमचा शेतकरी महसूल आणि पोलिसांच्या नाकावर टिच्चून कमी पाण्यावर येणाऱ्या अफू आणि गांजाची शेती करतील, असंही ते म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या-

अंकिताने शेअर केला मिलिंदसोबतचा रोमँटिक फोटो; पहा फोटो

-वयावरुन होत होती टीका; रौप्य पदक मिळवून टीकाकारांना चोख प्रत्युत्तर

-फोगटकन्या विनेशचा सुखद धक्का; विमानतळावरच उरकला साखरपुडा

-राजीव गांधी सामूहिक हत्याकांडाचे जनक; दिल्लीतील रस्त्यांवर भाजपची पोस्टरबाजी

-नीरजच्या भाल्याचा नेम हजार नंबरी; साधला विक्रमी ‘सुवर्ण’वेध!